तरुण - तरुणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही काळापासून अल्पवयीन काळात तरुण तरुणी प्रेमात पडतात. या प्रेमसंबंधातून त्यांच्यामध्ये शारीरिक जवळीक देखील होते. पण काही काळाने हेच प्रेमसंबंध तुटले, की ब्रेकअपपूर्वी ठेवलेले शारीरिक संबंध हे बलात्कार ठरतो का? यावर एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.वी. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंठपीठाने स्पष्ट केलं आहे की, नात तुटलं म्हणून तरुणी तरुणांवर पूर्वी केलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणू शकत नाहीत. ब्रेकअपपूर्वीचे शारीरिक संबंध हे बलात्कार ठरवता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलंय.
केरळमधील एका व्यक्तीच्या सुनावणी दरम्यान हा नोंदवण्यात आलंय. त्या व्यक्तीविरोधात बलात्कार, फसवणूक आणि पहिला विवाह कायम असताना दुसरा विवाह केल्याच्या आरोप करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याला या आरोपांमधून मुक्त केलं आहे.
दरम्यान सुरुवातीपासूनच फसवणूक किंवा खोटेपणाच्या आधारावर संमती मिळवली गेली होती आणि नाते संपल्यानंतर पूर्वीच्या संबंधांबद्दल पश्चात्ताप झाला, या दोन वेगवेगळ्या परिस्थिती असल्याचेही खंडपीठाने नमूद केलंय.