पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ बिल्डिंगमध्ये एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मुग्धा अविनाश देशमुख नाव असून या प्रकरणात एक ट्विस्टदेखील आहे. मुग्धा ही संभाजीनगरमधील रहिवाशी होती. मुग्धाने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठवलं. तिथे तिने COEP महाविद्यालयातून पदवी घेतली. मग जुलै 2025 मध्ये MBA करण्यासाठी ती लंडनला गेली. आई -वडीलही यामुळे आनंदी होते.
मुग्धाचे आई - वडील हे संभाजीनगरमध्ये राहतात. मुग्धा ही त्यांची मोठी मुलगी होती. मुग्धाशिवाय त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुग्धाचे वडिलांचं नाव अविनाश देशमुख असून ते शासकीय सेवेतून शहर अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. लंडनला गेली लेक आई वडिलांनी रोज फोन करत होती. अगदी अनेक वेळा व्हिडीओ कॉलही करत होती. मग ती पिंपरी - चिंचवडमध्ये कशी पोहोचली, ती भारतात कशी आली असे अनेक प्रश्न आई - वडिलांना पडले आहेत. 23 ऑक्टोबरला शेवटचा फोन नंतर त्यांना मुलीचा मृतदेह दिसल्यामुळे त्यांच्या आयुष्यात वादळ आलं आहे.
23 ऑक्टोबरला शेवटचा फोन झाला तेव्हा मुग्धा घाई होती, मला जॉब इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे असं सांगितलं, अशी माहिती आईने पोलिसांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी आई, वडील, भाऊ, बहीण अगदी नातेवाईकांपासून फ्रेंड्स सगळ्यांनी मुग्धाला फोन लावला पण तिने उचलला नाही. काही वेळा तिचा फोन स्विच ऑफ यायला लागला. मग सगळ्यांना टेन्शन आलं. त्यानंतर लंडनमधील मुग्धाच्या एका मैत्रिणीला संपर्क केला. तेव्हा तिने सांगितलं की, 22 ऑक्टोबरनंतर आम्ही बोललो नाहीय. मग तिला लंडनमध्ये मुग्धा हरवल्याची तक्रार पोलिसांकडे करायला सांगितलं.
लंडन पोलिसांनी तपास सुरु केल्यावर समजलं की, मुग्धाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लंडन सोडलं असं मुग्धाच्या मैत्रिणीला लंडन पोलिसांनी सांगितलं. ही माहिती तिने मुग्धाच्या आई वडिलांना दिली. हे ऐकून त्यांना दुसरा धक्का बसला. त्यांना ही माहिती 26 ऑक्टोबरला मिळाली. मग आता लेकीला कसं शोधायचं म्हणून तिच्या बँक अकाऊंची माहिती काढली. त्या समजलं ती भारतात आहे. शिवाय ती ऑनलाइन साइट्सवरून जेवण ऑर्डर करते. मग त्यांनी 27 ऑक्टोबरला संभाजीनगरमधील पोलीस स्टेशन गाठलं. तिथे मुग्धाचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार नोंदवली. त्यासोबत त्यांनी सगळी माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनीही मुग्धाचं लोकेशन ट्रेस केलं असता ती पिंपरी - चिंचवडमधील एका सोसायटीमध्ये असल्याचे समजलं.
त्यानंतर पोलीस पिंपरी - चिंचवडमधील गहूंजे इथल्या बिल्डिंगमध्ये दाखल झाले. रात्री अकराच्या सुमारास मुग्धाच्या आई - वडिलांसोबत ते लोढाला पोहोचले. लोकेशन दाखवत असलेला फ्लॅट आतून लॉक होता आणि बेल वाजवल्यानंतरही कोणी दार उघड नव्हतं. त्यानंतर की मेकरच्या मदतीने चावी बनवण्यात आली आणि घराचे दार उडले. दार उघडताच दुर्गंध यायला लागला. फ्लॅटमधील बेडरूममध्ये गेल्यावर मुग्धा बेडवर एका अंगावर झोपली होती. तिच मृतदेङ कुजलेल्या अवस्थेत पाहून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पुढे तपास केल्यावर असं आढळून आलं की, मुग्धाने हे घर एप्रिल 2026मध्ये भाड्याने घेतला. असं ऍग्रिमेंट फ्लॅटच्या मालकाने पोलिसांना दिलं आहे. पोलिसांनी फ्लॅटच्या आजूबाजूला विचारल्यावर समजलं ती इथे एकटी राहत होती. शिवाय तिच्याकडे कोणी येत जात पण नव्हतं. घराची झाडाझडती केल्यावर तिथेही काही संशयास्पद आढळलं नाही. एवढंच नाही तर तिच्या फोन हिस्ट्रीमधूनही काही उघड झालं नाही. शवविच्छदेन अहवालदेखील समोर आला आहे, त्यातही काहीही इजा किंवा संशयास्पद आलं नाही. याचा अर्थ तिचा मृत्यू हृदयविकाराने झाला की काय असा प्रश्न उपस्थितीत होतोय. पण मुग्धाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
पण ती इथं एकटीच राहायची, सोसायटीत बाहेरच्या व्यक्तीला सहसा प्रवेश मिळणं कठीणचं आहे. सुरक्षा रक्षक आणि शेजारच्यांकडे चौकशी केली असता तिच्याकडे कोणी येत होतं? किंवा तिच्या फोन हिस्ट्रीमधून ती फार कोणाच्या संपर्कात होती? असं ही काही आढळलं नाहीये. घराची झडती घेतली तर संशयास्पद ही काही आढळलं नाही. शवविच्छेदन अहवालात ही शरीरावर कोणत्या इजा दिसून आल्या नाहीत. पण खबरदारी म्हणून व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यामुळं मुग्धाचा मृत्यू अटॅकमुळं झाला असावा? असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय.