• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /PNB मध्ये 10.24 कोटींचा घोटाळा? महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांचे लॉगिन वापरून पैसे वळवले? एका पासबुकमुळे प्रकरण उघड!

PNB मध्ये 10.24 कोटींचा घोटाळा? महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांचे लॉगिन वापरून पैसे वळवले? एका पासबुकमुळे प्रकरण उघड!

ग्रेटर नोएडातील PNB शाखेत 10.24 कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप आहे. महिला कर्मचारी दीपांशी आणि खातेधारक अशुतोष पाठक यांच्याविरोधात CBI ने गुन्हा दाखल केला.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 31, 2026, 03:43 PM IST|Updated: Oct 31, 2026, 03:54 PM IST
joinshare
PNB मध्ये 10.24 कोटींचा घोटाळा? महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांचे लॉगिन वापरून पैसे वळवले? एका पासबुकमुळे प्रकरण उघड!
Image Credit: पीएनबी घोटाळा

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

2

‘माझ्या जीवाला धोका, बिल्डरचे गुंड धमकावून घर रिकामी करायला लावतायत' मराठी अभिनेत्याने फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत!

3

PNB मध्ये 10.24 कोटींचा घोटाळा? महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांचे लॉगिन वापरून पैसे वळवले? एका पासबुकमुळे प्रकरण उघड!

4

संभाजीनगरमधून लंडनमध्ये MBA साठी गेली, पण मृतदेह सापडला पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये; 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन्...

5

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीच्या ग्रेटर नोएडा येथील शाखेत ग्राहकांच्या बचत खात्यांसह मुदत ठेवींमधून 10.24 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बँकेच्या प्राथमिक तपासात एका महिला कर्मचाऱ्याने इतर अधिकाऱ्यांचे लॉगिन तपशील वापरून अनधिकृत व्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने गुन्हा दाखल केला. एका ग्राहकाने पासबुक अपडेट केल्यानंतर संशयास्पद व्यवहार उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. काय घडलंय नेमकं? याचा इतर ग्राहकांवर काय परिणाम होणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पासबुक अपडेट करताना संशयास्पद व्यवहार उघड

ग्रेटर नोएडातील सेक्टर पाई परिसरातील पीएनबी शाखेत संगीता नावाच्या ग्राहक पासबुक अपडेट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या खात्यात 16 सप्टेंबर रोजी झालेले तीन व्यवहार त्यांच्या निदर्शनास आले. हे व्यवहार आपण केले नसल्याचे त्यांनी बँकेला सांगितले. त्यानंतर शाखा व्यवस्थापकांनी तपास सुरू केला. व्यवहारांशी संबंधित आवश्यक व्हाउचर उपलब्ध नसल्याने संशय अधिक गडद झाला.

महिला कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप

बँकेच्या तक्रारीनुसार, शाखेत कार्यालयीन सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या दीपांशीवर अनधिकृत व्यवहार केल्याचा आरोप आहे. तिने शाखेतील इतर सहा अधिकाऱ्यांचे सीबीएस म्हणजेच कोअर बँकींग सिस्टिममधील यूजर आयडी आणि पासवर्ड वापरल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अशुतोष पाठक यांच्याशी आर्थिक व्यवहारांचा संबंध?

CBI च्या FIR मध्ये अशुतोष पाठक यांचे नाव खातेधारक म्हणून समाविष्ट आहे.  ग्राहकांच्या खात्यांमधून वळवलेली रक्कम विविध लाभार्थी खात्यांमार्फत पाठक यांच्याशी संबंधित खात्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे. बँकेने यासंदर्भात तक्रार दाखल केलीय. काही मुदत ठेवींची माहिती बदलणे, त्या मुदतीपूर्वी बंद करणे आणि त्यातून मिळालेली रक्कम दुसऱ्या खात्यांत वळवणे असे प्रकारही प्राथमिक तपासात समोर आले आहेत.

तीन वर्षांपासून गैरव्यवहार सुरू?

बँकेच्या तक्रारीनुसार, गेल्या सुमारे तीन वर्षांपासून वेगवेगळ्या ग्राहकांच्या खात्यांत अनधिकृत व्यवहार होत असल्याचा संशय आहे. बचत खात्यांमधील रक्कम, मुदत ठेवींचे तपशील आणि ग्राहकांना मिळणारे व्यवहारांचे मोबाइल अलर्ट यामध्ये फेरफार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सुमारे 10.24 कोटी रुपयांचे अनधिकृत व्यवहार बँकेने ओळखले असून अंतिम नुकसान किती आहे, याची पडताळणी अद्याप सुरू आहे.

ग्राहकांना PNB ने काय दिले आश्वासन?

PNB च्या तक्रारीनंतर CBI च्या गाझियाबाद येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने गुन्हा दाखल केला. दीपांशी, अशुतोष पाठक आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार तपास सुरू आहे. बँकेने तीन ग्राहकांचे एकूण 43 लाख रुपयांचे दावे निकाली काढल्याचे सांगितले असून, वैध दाव्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Banking News