• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /ज्या कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात होतेय वृक्षतोड त्याच पर्वतरांगेत आहे 'महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील अनोखे रत्न'; उद्धव ठाकरेंनी स्वत: Click केलेले Aerial फोटो शेअर करत दिली माहिती

ज्या कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात होतेय वृक्षतोड त्याच पर्वतरांगेत आहे 'महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील अनोखे रत्न'; उद्धव ठाकरेंनी स्वत: Click केलेले Aerial फोटो शेअर करत दिली माहिती

कर्जत-भीमाशंकर येथे टोरंटच्या प्रकल्पासाठी 32 हजारांहून अधिक झाडं कापली जाणार असून यावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उद्धव ठाकरेंनी याच भागातील एका सुंदर गडाचे स्वत: काढलेले फोटो शेअर करत त्याची माहिती दिलीये...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 31, 2026, 01:33 PM IST|Updated: Oct 31, 2026, 01:57 PM IST
joinshare
ज्या कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात होतेय वृक्षतोड त्याच पर्वतरांगेत आहे 'महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील अनोखे रत्न'; उद्धव ठाकरेंनी स्वत: Click केलेले Aerial फोटो शेअर करत दिली माहिती
Image Credit: या किल्ल्याची सविस्तर माहितीही सांगितली (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'प्रेमसंबंध तुटल्यानंतर पूर्वीच्या शारीरिक संबंधांना बलात्कार...', सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'प्रेमसंबंध तुटल्यानंतर पूर्वीच्या शारीरिक संबंधांना बलात्कार...', सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

2

'तुम्हाला त्याला बेंचवरच ठेवायचे असेल, तर त्याला घरी पाठवा...', वैभवला वगळल्यानंतर माजी खेळाडू संतापला!

3

'पंजाब्यांना लढायला शिकवू नका!' दिलजीत दोसांझचा दिल्ली कॉन्सर्टमध्ये थेट इशारा; अभिजीत दिपकेंनी मागितली माफी?

4

डेटा सेंटरसाठी 4 लाख झाडं एकही परवानगीशिवाय कापल्याचा Google वर आरोप; जंगलातले प्राणी शहरात घुसले, नद्यांमध्ये घाण पाणी, सुपीक माती गायब अन्...

5

धक्कादायक! किरकोळ वादावरून 22 वर्षीय क्रिकेटरवर तलवारीने हल्ला, नेमकं काय घडलं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कर्जत-भीमाशंकरच्या हिरव्यागार पर्वतरांगेत उभा असलेला ऐतिहासिक कोथळीगड चर्चेत असून, "पेठ गावाजवळील काळ्याकभिन्न कातळाचा बाणेदार सुळका म्हणजे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील अनोखे रत्न" असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये कोथळीगडासंदर्भात बोलताना केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या काळात असलेले महत्व उद्धव ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून नमूद केलेलं आहे. कोकण आणि मावळ प्रांतावर नजर ठेवण्यासाठी कोथळीगडाचे अधिक महत्त्व असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कोलिंबा आणि सावळे घाटातील व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गडाचा वापर व्हायचा, असाही उल्लेख पोस्टमध्ये आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात टेहळणी आणि लष्करी हालचालींसाठी महत्त्वाची चौकी म्हणून वापरला जायचा.  कातळात खोदलेल्या गुहा, पाण्याच्या टाक्या आणि भैरोबाची गुहा ही गडाचे वैशिष्ट्यं आहेत.  उद्धव ठाकरेंनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेली पोस्ट जशीच्या तशी खालीलप्रमाणे:

"कर्जत-भीमाशंकरच्या हिरव्यागार पर्वतरांगेत पेठ गावाजवळ उभा असलेला काळ्याकभिन्न कातळाचा हा बाणेदार सुळका.. महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील हे अनोखे रत्न, पेठचा किल्ला.. कोथळीगड..!

कोकण आणि मावळप्रांताच्या द-याखोऱ्यांवर,कोलिंबा आणि सावळे घाटाच्या व्यापारी मार्गावर करडी नजर रोखून असलेला. भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सह्याद्रीच्या मस्तकावरील हा जागृत प्रहरी कोथळीगड...



छत्रपती शिवरायांनी अत्यंत भक्कम केलेल्या या दुर्गाचा वापर उत्तर कोकण आणि कल्याण-भिवंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करी चौकी म्हणून केला. टेहळणी, संदेशवहन, सैन्य हालचाल आणि गुप्त शस्त्रागार व दारुगोळा साठ्याचा हा मुख्य आधारवड होता... कोथळीगड..!

पेठ गावातून वर गेल्यावर सामोऱ्या येतात कातळ कड्यांच्या पोटात खोदलेल्या गुहा! देवीची गुहा व पाण्याच्या टाक्यानंतर दिसते आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा, आत गुहेच्या छताला आधार देणारे कोरीवकाम केलेले शिल्पस्तंभ आहे. 13 व्या शतकातील किंबहुना आधीपासूनची विस्मयीत करणारी ही स्थापत्यकला. या गडाचे सर्वात विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे आकाशाला भिडू पाहणाऱ्या या कातळी सुळक्याच्या पोटात कोरलेले उर्ध्वमुखी भुयार! आत खडकात कोरलेला गोलाकार वळणे घेत वर जाणारा दगडी जिना, बाहेरील जगाला न दिसणारा, माथ्यावर सुरक्षित पोहोचवणारा हा भुयारी जिना म्हणजे प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राचा,अभियांत्रिकी बुद्धिमत्तेचा अद्भुत आविष्कार..!



छत्रपती संभाजीराजांच्या काळात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला हा दुर्ग घेण्यासाठी औरंगजेबाने 1684 ला अब्दुल कादीरला पाठवले. गड कितीही भक्कम असला तरी विश्वासघाताची भेग त्याला घातक ठरते. किल्लेदार नारो त्रिंबक रसद आणण्यासाठी गडाबाहेर पडले आणि विश्वासघाताने गडाचे दरवाजे उघडले गेले. अभेद्य दुर्गरचना असहाय्य ठरली. औरंगजेबाने गड जिंकल्याचे बक्षीस म्हणून अब्दुल कादीरला सोन्याची किल्ली भेट दिली आणि गडाचे नाव ठेवले मिफ्तहुलफतेह म्हणजेच विजयाची गुरुकिल्ली..!



पुढे 2 नोव्हेंबर 1817 ला बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापूराव यांनी हा गड जिंकला. मात्र तो पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मानवी स्थापत्याची,इतिहासाची आणि निसर्गाशी साधलेल्या मैत्रीची कहाणी म्हणजे कोथळीगड...!

आपल्या माथ्यावरून कर्जत-भीमाशंकरचे घनदाट जंगल, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड अशा प्रचंड देखण्या मुलूखाचे दर्शन घडवणारा, मराठी मनांचा अभिमानी मुकुटमणी, सह्याद्रीच्या काळजात कोरलेली शौर्याची, त्यागाची ही अमिट मुद्रा, स्वांतत्र्याचा, स्वराज्याचा हा तेजस्वी दिपस्तंभ... कोथळीगड..!!

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uddhav Thackeray (@uddhavthackeray)

 या वरील पोस्टमधील फोटो उद्धव ठाकरे यांनी काढले असून माहिती शिवसेनेचे उपनेते नितीन बानूगडे पाटील यांनी लिहली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Thane
Uddhav Thackeray
Shiv Sena UBT