• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /डेटा सेंटरसाठी 4 लाख झाडं एकही परवानगीशिवाय कापल्याचा Google वर आरोप; जंगलातले प्राणी शहरात घुसले, नद्यांमध्ये घाण पाणी, सुपीक माती गायब अन्...

डेटा सेंटरसाठी 4 लाख झाडं एकही परवानगीशिवाय कापल्याचा Google वर आरोप; जंगलातले प्राणी शहरात घुसले, नद्यांमध्ये घाण पाणी, सुपीक माती गायब अन्...

हा सारा प्रकार समोर आल्यापासून जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीवर अनेकांनी आगपाखड केली असून कोणी इतकं असंवेदनशील कसं असू शकतं? असा सवाल केला जातोय.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 31, 2026, 02:21 PM IST|Updated: Oct 31, 2026, 02:36 PM IST
joinshare
डेटा सेंटरसाठी 4 लाख झाडं एकही परवानगीशिवाय कापल्याचा Google वर आरोप; जंगलातले प्राणी शहरात घुसले, नद्यांमध्ये घाण पाणी, सुपीक माती गायब अन्...
Image Credit: देशात एकच खळबळ (प्रातिनिधिक फोटो सौजन्य वृत्तसंस्था आणि फ्री-पिकवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
संभाजीनगरमधून लंडनमध्ये MBA साठी गेली, पण मृतदेह सापडला पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये; 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन्...

संभाजीनगरमधून लंडनमध्ये MBA साठी गेली, पण मृतदेह सापडला पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये; 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन्...

2

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार

3

'मी गेल्यावर दुसरं लग्न कर...', इंजिनीअरच्या पत्नीने मुलाला घेऊन उचललं टोकाचं पाऊल; पुणे हादरलं!

4

'प्रेमसंबंध तुटल्यानंतर पूर्वीच्या शारीरिक संबंधांना बलात्कार...', सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

5

'तुम्हाला त्याला बेंचवरच ठेवायचे असेल, तर त्याला घरी पाठवा...', वैभवला वगळल्यानंतर माजी खेळाडू संतापला!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सध्या रायगडमधील कर्जत येथील जंगलामध्ये टोरंटच्या प्रोजेक्ट वृक्षतोड होत असल्याने महाराष्ट्रभरात या प्रकल्पाची चर्चा असतानाच दुसरीकडे आता वृक्षतोडीमुळे जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलवरही टीका होताना दिसतेय.

गुगलवर जगभरातून टीका

गुगलने त्यांच्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) डेटा सेंटरच्या उभारणीसाठी, कोणतीही कायदेशीर मंजुरी किंवा पर्यावरणासंदर्भातील रिव्ह्यू घेऊन संमती मिळण्याआधीच अडीच लाख झाडं कापल्याचा प्रकार फिनलँडमध्ये समोर आला आहे. तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर ठरवण्यात आलेल्या गंभीर कृत्यामुळे गुगलवर जगभरातून, खास करून फिनलँडमधून प्रचंड टीका होत असून तिथल्या न्यायालयाने गुगलच्या या प्रकल्पाच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

815 एकरांच्या जंगलाच्या जमिनीवर एआय डेटा सेंटर

गुगल फिनलँडमधील 'मुहोस' (Muhos) येथे 330 हेक्टर म्हणजेच 815 एकरांच्या जंगलाच्या जमिनीवर एआय डेटा सेंटर आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. फिनलँडमधील कायद्यानुसार, एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आधी 'एनव्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट' पूर्ण करावे लागते. म्हणजेच या प्रकल्पाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करुन अहवाल सादर करावा लागतो. मात्र, गुगलने हे मूल्यांकन पूर्ण होण्याआधीच अवाढव्य प्रमाणावर वृक्षतोड केली आहे.

तातडीने काम थांबवण्याचे आदेश

मुहोस येथील अडीच लाख झाडे कापण्यात आली असून, एकूण दोन वेगवेगळ्या ठिकाणांवर मिळून जवळपास चार लाख झाडे कापल्याचा आरोप गुगलवर आहे. एकेकाळी घनदाट जंगल असलेल्या या जागी आता फक्त ओसाड जमीन, वाळू आणि चिखलाचे मैदान उरलं आहे. पर्यावरणवाद्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर, फिनलँडमधील प्राधिकरणाने आणि न्यायालयाने गुगलला या जागेवरील झाडे काढणे, रस्ते बांधणे, ड्रेनेजचे काम आणि उत्खनन तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या परवानगी कसली?

केवळ नियोजन आणि मातीचा अभ्यास करण्याची परवानगी सध्या गुगलला देण्यात आली आहे. मात्र गुगलसारख्या कंपनीने हा प्रकार केल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे. 

सुपीक माती गायब? प्राणी शहरांमध्ये...

झाडांची कत्तल करण्यात आली असून जमीन सपाट करण्यासाठी वरची सुपीक मातीही काढून टाकण्यात आल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगल नष्ट झाल्यामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. अन्नाच्या शोधात लांडग्यांचे कळप थेट जवळच्या शहरांमध्ये आणि मानवी वस्त्यांमध्ये शिरू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांकडून देण्यात आलं आहे. जंगलातील वरची माती काढल्यामुळे आणि पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न केल्यामुळे परिसरातील नद्या व ओढ्यांमध्ये दूषित पाणी वाहत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News