• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /रोहित शर्माने का निवडली 45 नंबरची जर्सी? आई आणि राहुल द्रविडशी आहे खास कनेक्शन, स्वतः सांगितला किस्सा

रोहित शर्माने का निवडली 45 नंबरची जर्सी? आई आणि राहुल द्रविडशी आहे खास कनेक्शन, स्वतः सांगितला किस्सा

Rohit Sharma Jersey Number : रोहित शर्माचा जर्सी क्रमांक 45 ही त्याची ओळख आहे. कुठेही 45 क्रमांकाची भारतीय जर्सी पाहिली तर रोहित शर्माची आठवण फॅन्सला होते. मात्र रोहितने हाच जर्सी क्रमांक का निवडला याचं कारण जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Oct 31, 2026, 06:31 AM IST|Updated: Oct 31, 2026, 07:34 AM IST
joinshare
रोहित शर्माने का निवडली 45 नंबरची जर्सी? आई आणि राहुल द्रविडशी आहे खास कनेक्शन, स्वतः सांगितला किस्सा
Image Credit: रोहित शर्माने का निवडली 45 नंबरची जर्सी?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'तुझी लायकी किती तू...' म्हणत टीका करणाऱ्या निलेश राणेंना बन यांनी पुन्हा डिवचलं; नारायण राणेंसोबतचे फोटो पोस्ट करत म्हणाले, 'ज्युनिअर नवनाथ बन विथ...'

'तुझी लायकी किती तू...' म्हणत टीका करणाऱ्या निलेश राणेंना बन यांनी पुन्हा डिवचलं; नारायण राणेंसोबतचे फोटो पोस्ट करत म्हणाले, 'ज्युनिअर नवनाथ बन विथ...'

2

एकीकडे दुष्काळाच्या झळा तर दुसरीकडे कर्जवसुलीचा फास, हिंगोलीच्या मजुरांवर दुहेरी संकट, राहत्या घराबाहेर लावले विक्रीचे फलक

3

अंतर्वस्त्र काढायला लावली अन्..., सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर...; पूर्णेकर समर्थकांवर ठाणे पोलिसांकडून अत्याचार झाल्याचा आरोप, तरुण म्हणाला...

4

घरासमोरच्या कार पार्किंगवरुन वाद! 22 सेकंदात एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं; थरार Video मध्ये कैद

5

आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2026 : ऑक्टोबरचा शेवटचा शनिवार या राशीचे लोक वाहन किंवा घर खरेदीचे स्वप्न करणार पूर्ण, तर यांनी घ्यावी काळजी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Rohit Sharma Jersey Number : हिटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा मैदानात उतरताना 45 क्रमांकाची जर्सी घालतो.  एका शोमध्ये रोहितने आपल्या जर्सीवरील 45 नंबर का निवडला याचं कारणं सांगितली आहेत. यामागे रोहित शर्माने त्याची आई आणि राहुल द्रविड असल्याचे सांगितले.

गेमिंग रिऍलिटी शोमध्ये विचारला प्रश्न:

रोहित शर्मा सध्या एक रिऍलिटी शो फॅमिली फुल हाउस विथ रोहित शर्मा हा शो होस्ट करत आहे. या शो दरम्यान अभिनेता राहुल लोहानीने रोहितला त्याच्या 45  नंबरच्या जर्सी मागचं कारण विचारलं. राहुल म्हणाला की जेव्हा 45 नंबरची जर्सी लोक बघतात त्यांना तुमचीच आठवण येते. तेव्हा नेमका हाच क्रमांक जर्सी नंबर म्हणून का निवडला असा प्रश्न रोहितला करण्यात आला.

अंडर 19 क्रिकेटमध्ये घालायचा 19 नंबरची जर्सी :

रोहित शर्माने प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, 'जेव्हा त्याने पहिल्यांदा क्रिकेट खेळण्यासाठी जर्सी घातली, तेव्हा त्याला आपल्या पसंतीचा क्रमांक निवडायचा होता. त्याला एक अंकी क्रमांक हवा होता. परंतु पाच, आठ आणि नऊ यांसारखे क्रमांक आधीच इतर खेळाडूंनी घेतले होते. तेव्हा रोहितकडे  त्याच्याकडे केवळ 19 हा क्रमांक शिल्लक होता. रोहितला हा क्रमांक आवडला आणि त्याने आपल्या अंडर-19 क्रिकेटच्या दिवसांत 19 क्रमांकाची जर्सी घातली होती. केली होती'.

राहुल द्रविडमुळे सोडली 19 नंबरची जर्सी :

रोहित शर्माने सांगितलं की, जेव्हा भारतीय संघासाठी खेळण्याची वेळ आली तेव्हा रोहितला समजलं की तो 19 क्रमांकाची जर्सी घालू खेळू शकत नाही, कारण आधीच राहुल द्रविड हे भारतीय संघाचे कर्णधार होते आणि त्यांचा जर्सी क्रमांक हा 19 होता. रोहितच्या सांगण्यानुसार त्याला कोणीतरी सांगितले होते की, तो अंडर 19 संघासाठी खेळताना 19 क्रमांकाची जर्सी वापरू शकत असला, तरी भारतीय संघासाठी खेळताना तो हा क्रमांक वापरू शकणार नाही, कारण तो राहुल द्रविडचा क्रमांक होता. हे ऐकल्यावर रोहितने दुसरा क्रमांक निवडण्याचा निर्णय घेतला.

रोहितने आईचा घेतला सल्ला :

रोहित शर्मा म्हणाला की, 'हॉटेलवर पोहोचल्यावर मी लगेचच आईला फोन केला की मी कोणता जर्सी क्रमांक निवडू? तेव्हा आईने लगेचच 9 क्रमांकाची जर्सी निवडण्याचा सल्ला दिला. मात्र तो क्रमांक सुद्धा दुसऱ्या खेळाडूंकडे होता. तेव्हा रोहितला 27 क्रमांकाची जर्सी घालायचीही नव्हती. त्याला चार आणि पाच हे क्रमांक एकत्र असलेले खूप आवडायचे. त्याने आपल्या आईला असेही सांगितले की 45 ही संख्या चांगली दिसते आणि या दोघांची बेरीज ही नऊ येते. त्यानंतर, रोहित शर्माने आपल्या जर्सीसाठी 45 ही संख्या निवडली'.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rohit Sharma
Team india
Cricket News
Marathi News