• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /'त्यांच्या पार्श्वभागांमध्ये अ‍ॅसिड, लाल मिरची पावडर टाकली', राऊताचा गंभीर आरोप; थेट गृहमंत्री, पालकमंत्र्यांना सवाल! 'एका बाईसाठी आणि तिच्या...'

'त्यांच्या पार्श्वभागांमध्ये अ‍ॅसिड, लाल मिरची पावडर टाकली', राऊताचा गंभीर आरोप; थेट गृहमंत्री, पालकमंत्र्यांना सवाल! 'एका बाईसाठी आणि तिच्या...'

प्रदीप पूर्णेकरांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेल्या तरुणांपैकी दोघांसोबत पोलिसांनी क्रूर कृत्यं केल्याचा आरोप केला जात असून यावरुन आता राऊत यांनी संताप व्यक्त करताना काय म्हटलंय पाहा...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 31, 2026, 12:00 PM IST|Updated: Oct 31, 2026, 12:16 PM IST
joinshare
'त्यांच्या पार्श्वभागांमध्ये अ‍ॅसिड, लाल मिरची पावडर टाकली', राऊताचा गंभीर आरोप; थेट गृहमंत्री, पालकमंत्र्यांना सवाल! 'एका बाईसाठी आणि तिच्या...'
Image Credit: गृहमंत्री, पालकमंत्र्यांवर साधला निशाणा (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
डेंजर अपघातात बिझनेसमनचा मृत्यू! फॉर्च्युनर पुलावरुन नदीत कोसळली, बुडालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह; मृत्यूच्या एक तास आधीच पत्नीसोबत...

डेंजर अपघातात बिझनेसमनचा मृत्यू! फॉर्च्युनर पुलावरुन नदीत कोसळली, बुडालेल्या कारमध्ये सापडला मृतदेह; मृत्यूच्या एक तास आधीच पत्नीसोबत...

2

'मॅडम, थांबा...', जुहूमध्ये महिलेकडून Hit & Run! कार, 2 दुचाक्यांना धडकल्यानंतर पोलिसांवरही कार चढवली अन्... | Viral Video

3

हॉंगकॉंग सिक्सेसमध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यावर शहबाज शरीफचं बालिश वर्तन, आकाश चोप्राने केलं ट्रोल

4

'त्यांच्या पार्श्वभागांमध्ये अ‍ॅसिड, लाल मिरची पावडर टाकली', राऊताचा गंभीर आरोप; थेट गृहमंत्री, पालकमंत्र्यांना सवाल! 'एका बाईसाठी आणि तिच्या...'

5

आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील मानपाडा येथील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पूर्णकर समर्थक तरुणांवर पोलिसांनी अत्याचार केल्याचे गंभीर आरोप पीडित तरुणांनी केले आहेत. दोन तरुणांना पोलिसांनी बेदम मारहाण करुन त्यांना अश्लील गोष्टी करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात असतानाच आता या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांवर या प्रकरणावरुन निशाणा साधला आहे.

पोलीस ठाण्याच्या पालकमंत्र्यांच्या घरी भांडी घासत आहेत का?

पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी, "ठाण्यामध्ये पूर्णेकर हत्या प्रकरण जे आरोपी पकडले जावे यासाठी आंदोलन करत आहेत त्या तरुण मुलांना ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून निर्दयपणे मारले आहे. त्यांच्या पार्श्वभागांमध्ये ऍसिड टाकले आहे. लाल मिरचीची पावडर टाकली.  मी टीव्ही ऐकले आहे.  कुठे आहेत मुख्यमंत्री? कुठे आहे संवेदनशीलता? ठाण्याचे पोलीस ठाण्याच्या पालकमंत्र्यांच्या घरी भांडी घासत आहेत का? आम्ही बोललो तर तोंडातली शब्द वळत नाही," असा घणाघात केला आहे.

त्या पोलिसांच्या घरी मोर्चे काढू

"ती मुलं काय सांगत आहेत नीट पहा. त्याला कशाप्रकारे मारले आहे. या पोलिसांची नावे आता आम्ही जाहीर करू. हे जे नराधम आहेत पोलीस खात्यातील, जे एकनाथ शिंदेंच्या घरी धुणीभांडी करत आहेत आणि त्या पोलिसांच्या घरी मोर्चे काढू," असा थेट इशारा राऊत यांनी दिला आहे.  

कुठे आहे राज्याची सुव्यवस्था?

"पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळायला हवा. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना जर जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. गृहमंत्री इतके हतबल आणि दुर्बल झाले आहेत. ते नापास झाले आहेत. त्यांनीसुद्धा गृहमंत्रीपद सोडले पाहिजे. कुठे आहे राज्याची सुव्यवस्था?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

पोलिसांनी एकनाथ शिंदेंचे गुंड म्हणून काम करायला सुरुवात केली

"पोलीस एक गुंडांच्या भूमिकेत आहेत. पोलिसांनी एकनाथ शिंदेंचे गुंड म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. कोणीही सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेला नाही. जर तुम्ही खाकी वर्दी घालून गुंडगिरी करत असाल तर भविष्यामध्ये त्याच लोकांना गुंडा सारखं मारलं जाईल," असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

एका बाईसाठी...

"या पोलिसांना देखील मुंबईत यायचं आहे. इतकी अमानुषता? ठाण्यामध्ये कोणासाठी? एका बाईसाठी आणि तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी का? अशी ती आहे कोण? झाशीची राणी आहे की राणीचारमा आहे की ताराबाई आहे, मला कळत नाही," अशी टीका राऊत यांनी केली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sanjay Raut
Eknath Shinde
Thane
crime