ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सातत्याने माजी नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप होत आहेत. मीनाक्षी शिंदेंनी राजीनामी द्यावा अशी मागणी गेल्या महिनाभरापासून होत होती. अखेर मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यांनी दिलेल्या पत्रात शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. राजीनाम्या दिल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मीनाक्षी शिंदे म्हणाल्यात की, मी राजीनाम दिला असून यावर मी लवकरच बोलणार आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्यावर मी लवकर भूमिका स्पष्ट करेल. मी पहिलेली बोले होते त्यानुसार पोलिसांना चौकशीत सहकार्य करत असून पोलिसांसमोर चौकशीला बोलल्यावर मी जात आहे. तर मी योग्य वेळी मी सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.
मीनाक्षी शिंदेंनी पत्रात लिहिलं की, गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षांतर्गत माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वबाबींचा एकत्रित वेध घेऊन माझ्यावर विविध आरोप करता पक्ष नेतृत्वाचा अर्थात मुख्य नेते व पक्षांतर्गत म्हणून आपणास वेढीस धरण्याचे जे षड्यंत्र चालू आहे ते पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते अशा भावना त्यांनी मांडल्या आहेत.
ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, हे कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे.
माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.