SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मध्य रेल्वे नेमकी का विस्कळीत झाली आहे? कधीपर्यंत सुरळीत होणार लोकल? PRO नी दिली सर्व माहिती

मध्य रेल्वे प्रवाशांना आज मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, जवळपास दीड ते दोन तास सेवा विस्कळीत झाली.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 26, 2026, 01:19 PM IST | Updated: Oct 26, 2026, 01:39 PM IST
Image Credit: मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल
Join

मध्य रेल्वे प्रवाशांना आज आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने अनेक प्रवासी ट्रेन आणि स्थानकांवर अडकून पडले आहेत. कामावर तसंच महत्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांची यामुळे कोंडी झाली आहे. दरम्यान मध्य रेल्वेवर नेमकी काय समस्या झाली आहे, तसंच लोकल पुन्हा कधी सुरळीत होईल यासंदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं आहे की, "सकाळी ओव्हरहेड वायरवर दुसरी वायर पडल्याने तांत्रिक बिघाड झाला. मुलुंड आणि ठाणेदरम्यान ही वायर पडली होती. त्या वायरला काढण्यासाठी 10 वाजल्यापासून एमर्जन्सी ब्लॉक घेण्यात आला. 10.48 वाजता तो ब्लॉक संपला आणि तेथील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. याशिवाय कांजूरमार्ग येथील विक्रोळी आणि भांडुपदरम्यान सिग्नलिंग टेस्टिंग रूममध्ये आग लागल्याने दोन स्थानकांदरम्यानचे सर्व सिग्नलचे इंडिकेशन बंद झाले. कांजूरमार्ग स्थानकावर तसेच विक्रोळी ते भांडुप दरम्यान गाड्या ए-बोर्ड प्राधिकरणाच्या आधारे चालवण्यात येत आहेत. सर्वच लाईनवरील वाहतूक 40-45 मिनिटे उशिराने सुरु आहे". 
 

एक्सवर मध्य रेल्वेने माहिती देताना सांगितलं आहे की, सुमारे 09:33 वाजता सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कांजूरमार्ग स्थानकावरील सर्व सिग्नल ब्लँक झाले. तसेच विक्रोळी ते भांडुप दरम्यानचे सिग्नलही ब्लँक झाले".

A-मार्कर: कांजूरमार्ग स्थानकावर तसेच विक्रोळी ते भांडुप दरम्यान गाड्या A-बोर्डवर चालविण्यात येत आहेत.
ॲब्सोल्युट ब्लॉक पद्धत: विक्रोळी ते भांडुप दरम्यान ॲब्सोल्युट ब्लॉक पद्धत लागू करण्यात आली आहे.
गाडी चालविण्याची परवानगी: गाड्या TD 912 प्राधिकरणानुसार चालविण्यात येत आहेत.
पहिल्या गाड्या:
डाउन लोकल लाईन, विक्रोळी येथून: गाडी क्रमांक K39
डाउन थ्रू लाईन, विक्रोळी येथून: गाडी क्रमांक BL11
सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


 

 

युद्धपातळीवर काम सुरु आहे. आता अप मार्गावरील गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न करतोय . डाऊन मार्गावरील गाड्या सुरू केल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES