SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष बदलल्या आहेत. विद्यमान रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 26, 2026, 22:49 IST | Updated: Nov 26, 2026, 22:51 IST
Join

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा बदल झााल आहे.  रोहिणी खडसेंना महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे. रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या आहेत. रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांच्या जागी अंजली साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत साळवे यांना पत्र देण्यात आले. 

विशेष म्हणजे, आजच राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांच्या जागी अंजली साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा (शरदचंद्र पवार), माननीय डॉ. फौजिया खान  यांच्या मान्यतेने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत, ॲड. अंजली साळवे-विठांकर यांची महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष (राष्ट्रीय महानगरपालिका) म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अशी पोस्ट राष्ट्रवादीच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन करण्यात आली आहे. मुंबई महिला शाखेच्या (एनएमसी) प्रदेशाध्यक्षपदी संगीता वाजे यांची नियुक्ती करण्यात आली. 

कोण आहेत  अंजली साळवे?

ॲड. अंजली साळवे-विठणकर या नागपूर येथील  नामांकित वकील, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीय नेत्या आहेत. महिला व बालहक्क तसेच ओबीसी (OBC) समाजाच्या हक्कांसाठी त्या प्रामुख्याने कार्य करतात. चंद्रपूर येथील सरदार पटेल कॉलेज ऑफ लॉ मधून कायद्याची पदवी घेतली असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून कायद्यामध्ये पीएचडी संपादन केली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशक आणि नागपूर येथील बाल कल्याण समितीच्या माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या कायदेशीर सल्लागार, समुपदेशक आणि विविध सरकारी व निमसरकारी संस्थांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. 

डॉ ऍड अंजली साळवे
नागपूर.
BSc ,Bed,BA,
LLB,CIG,Masters in Human Rights,Phd in Law.

1.महिला बाल हक्क व संविधान तसेच ओबीसी प्रश्नाच्या अभ्यासक , राष्ट्रीय स्तरावर  राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली च्या तक्रार व तपास विभागाच्या माजी समुपदेशक , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मायनर हेल्थ च्या माजी एथिकल कमिटी मेंबर (खाण मंत्रालय) ,तसेच बाल कल्याण समिती नागपूरच्या माजी सदस्य (मेंबर बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट) महाराष्ट्र राज्य असा राज्य स्तरावर कामकाजाचा अनुभव  असलेल्या,ओबीसी जनगणनेचा मुद्दा आक्रमक रित्या संसद ,विधिमंडळ,न्यायालय,व पाटीलावा अभियाना मार्फत जनजागृती करणाऱ्या ,  व पाटीवालीताई  अशी ओळख असणाऱ्या,तसेच महिला व बाल हक्क व ओबीसी जनगणना मुद्दा प्रसारमाध्यमातून आक्रमक व मुद्देसुद मांडणाऱ्या डॉ ऍड अंजली साळवे मुळच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या असून सध्या नागपुरात वास्तव्यास आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस,व नागपूर जिल्हा निरीक्षक म्हणून काम. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष ,माजी खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वात " दुष्काळाचा महिलांवर होणारा परिणाम" याबाबत   विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राचा  दौरा डॉ ऍड अंजली साळवे यांनी पूर्ण केला असून राज्यातील महिला,महिला  शेतकरी,महिला मजूर यांच्या सोबत संवाद साधला.पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत पक्षाची बाजू सक्षम रित्या मांडली.

2.शिक्षण - बालपणा पासून शिव फुले शाहू आंबेडकर विचारसरणीत चे वातावरण असल्याने महाविद्यालयीन काळापासून सामाजिक व राजकीय भूमिकेतून कार्य असून 1998 ला चंद्रपूर विधी महाविद्यालयात पुरुषांची मक्तेदारी मोडीत प्रथमच पहिली मुलगी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून त्या निवडून आल्या व विधी महाविद्यालयात ही ऐतिहासिक नोंद आहे.
शिक्षण - BSc ,Bed,BA,
LLB,CIG,Masters in Human Rights,Phd in Law. 
@भारतात  बालकांचे लैगिंक शोषण हे वास्तव असून यावर बालकांसाठी स्वतंत्र कायदा असावा या भूमिकेतून 2000 सालापासून भारतातील बालकांचे लैगिंक शोषण आणि मानवाधिकार दृष्टिकोन* या विषयात संशोधन सुरू केले व याच विषयावर  2012 ला माजी राष्ट्रपती माननीय अब्दुल कलाम यांचे उपस्थितीत डॉ ऍड अंजली साळवे यांना  Phd in  law बहाल झाली, व त्याच वर्षी भारतात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठीचा  ( पोक्सो )कायदा 2012 अस्तित्वात आला.

3.   ओबीसी प्रश्न व ओबीसीं जनगणना
i.2021 च्या जनगणेसंदर्भात जेव्हा केंद्र सरकारने 2019 साली अधिसूचना जाहीर केली त्या प्रश्नावलीत SC, ST,Othet असे तीनच कॉलम होते त्यात ओबीसी कॉलम नव्हता.केंद्र सरकारच्या जनगणना प्रश्नावलीत ओबीसी जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचे लक्षात येताच  डॉ ऍड अंजली साळवे ओबीसी च्या स्वतंत्र कॉलम च्या मागणी संदर्भात i.*न्यायालय  प्रकरण दाखल केले, ii.संसद - खासदार डॉ अमोल कोल्हे(2020) ,खासदार दिवंगत बाळू धानोरकर (2019), खासदार दिवंगत राजीव सातव यांचे सोबत चर्चा करून ओबीसी जनगणनेची मागणी संसदेत पोहचवली , 
iii.विधिमंडळ -ओबीसी जनगणनेचा ठराव पारित करा केंद्राकडे रेटून धरा ही ऐतिहासिक मागणी डिसेंबर 2019 ला  नागपूर येथील हिवाळी विधिमंडळत अधिवेशनात कित्येक आमदारान पुढे लावू  धरली व महाराष्ट्र विधानसभेत 8 जानेवारी 2020 ला तसा ठराव पारित करवून घेण्यात यश मिळविले.
iv . पाटी  लावा अभियान- 26.11.2019 ला  "ओबीसी
जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही तर आमचा सहभाग नाही".अशा आशयाची पाटी घरावर लावून इतरांना आवाहन करीत पाटी  लावा अभियान सुरू करून ओबीसी जनगणनेची मागणी करत या अभियाना अंतर्गत जनजागृती सुरू केली,विदर्भात या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला.तसेच 
जनगणनेसाठी रस्त्यावरील आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.ओबीसींच्या प्रश्नावर कायमच भूमिका मांडत आहे.
v.2020 ला  जंतर मंतर येथे डॉ ऍड अंजली साळवे यांचे नेतृत्वात ओबीसी का ऐलान पाटी लगाओ अभियान,हे  ओबिस संघटनी ,ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी आंदोलन केले.
vi.26.11.2019 ला सुरू केलेल्या पाटी लावा अभियान अंतर्गत "जनगणनेत ओबीसींचा कॉलम नाही तर आमचा सहभाग नाही "
हा डॉ ऍड अंजली यांचा नारा विदर्भाच्या मातीतून देशभर गाजत आहे.पाटीवालीताई म्हणून ओबीसी जनगणना लढ्यात  डॉ ऍड अंजली साळवे यांची ओळख आहे.
vii.ओबीसी पायलट प्रशिक्षणार्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत त्यांना न्याय मिळवून दिला.
viii. 2022 चंद्रपूर येथील ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या त्या स्वागताध्यक्ष राहिल्या.

4.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र  पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा नागपूर जिल्हा ग्रामीणच्या निरीक्षक आहेत.राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून कार्यकर्ता ते पदाधिकारी असा प्रवास राहिला.यात पक्षा मार्फत दिलेल्या विविध आंदोलनात सहभाग घेत विविध सामाजिक मुद्दे संसद व विधिमंडळात पोहचविण्याचे कार्य केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचार प्रसारात सहभागी होऊन व्याख्यान ,तसेच नागपूर नागपूर जिल्ह्यात कित्येक घोंगडी बैठका घेउन पक्षाची भूमिका मांडली.. पक्ष संघटन बळकटीसाठी  सतत प्रयत्नशील राहून विविध स्तरावरून पक्षप्रवेश करविले.प्रसारमाध्यमातून पक्षाची भूमिका आक्रमक रित्या मांडून पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहे.

5.शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीत वावर असल्याने सामाजिक न्यायाच्या भूमिका घेतात. महिला ,बालहक्क व संविधान व ओबीसी प्रश्नाच्या अभ्यासक.

6.खाण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या NIMH च्या एथिकल समितीच्या माजी सदस्य  म्हणून कार्य. ही खाण कामगारांच्या आरोग्यावर काम करणारी संस्था नागपूर महाराष्ट्रातून गुजरात राज्यात केंद्र सरकार द्वारे नेत असतांना ती महाराष्ट्रातच राहावी म्हणून 2020 ला डॉ ऍड अंजली साळवे यांनी प्रथम आवाज उचलून संसदेत हा आवाज पोहोचवला.

7.बालक,महिला अधिकार संविधान अभ्यासक तसेच ओबीसी प्रश्नाच्या  अभ्यासामुळे कित्येक ठिकाणी प्रशिक्षक व व्याख्यान .

8.राष्ट्रीय व राज्य पातळीवरच्या दांडग्या अनुभवामुळे  संघटन व प्रशासनावर पकड असून  प्रत्यक्ष लढ्यात सहभाग आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES