SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

आमदार रोहित पवारांच्या मनात सध्या काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यांच्या ‘एकला चलो रे’ धोरणाने राष्ट्रवादीत सध्या अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. अशातच पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 26, 2026, 23:20 IST | Updated: Nov 26, 2026, 23:23 IST
Join

रोहित पवार : आमदार रोहित पवारांच्या मनात सध्या काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय.   त्यांच्या ‘एकला चलो रे’ धोरणाने राष्ट्रवादीत सध्या अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. हिवाळी अधिवेशनात रोहित पवारांच्या नेतृत्वाच टॅक्टर मोर्चा काढण्यात येतोय. पण या मोर्चात पक्षाचा झेंडा नसणारय. त्यामुळं रोहित पवारांचा कोणता अजेंडा आहे? असा प्रश्न विचारला जात आहेत. अशातच राष्ट्रावदी पक्षाने रोहित पवारांच्या मोर्चाबाबत भूमिका जाहीर केली आहे. 

शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नासाठी रोहित पवारांनी न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चाची हाक दिली आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधून मोर्चाला 4 डिसेंबरला मोर्चाला सुरूवात होणार आहे, तर 9 डिसेंबरला नागपुरातील विधान भवनावर मोर्चा धडकणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत देण्याची प्रमुख मागणी आहे. रोहित पवारांनी जारी केलेल्या मोर्चाच्या पोस्टरवर फक्त शरद पवारांचा फोटो पहायला मिळतोय.  यामुळे रोहित पवार एकटे पडल्याची चर्चा आहे. अशातच आता रोहित पवारांच्या मोर्चाबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.  रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत.  

3 दिवसांपूर्वी रोहित पवारांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत अधिवेशनात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा  केली. मात्र याचमुळं पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू झाले.  कारण मोर्चाची घोषणा करताना रोहित पवारांनी वरिष्ठांना विश्वासात न घेतल्याचं बोललं जात आहे.  खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांवर नाराज असल्याचं समजतंय.  याचपार्श्वभूमीवर पवारांच्या  राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडली.  या बैठकीत रोहित पवारांच्या मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली. सर्व जिल्हा प्रमुख या बैठकीत सहभागी झाले होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रोहित पवार यांच्या मोर्च्यात सहभागी व्हावे यासाठी जिल्हा प्रमुखांना कोणत्याही थेट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रोहित पवारांचा मोर्चा हा पक्षविरहित आहे त्यामुळं मोर्च्याला जायच्या यायच्या  सूचना द्यायची गरज नाही  असं शशिकांत शिंदे यांनी सांगितले. यामुळे रोहित पवारांच्या मोर्चाला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे दिसत आहे.  

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES