SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले, भारताने धडा घ्यावा,' संजय राऊतांच्या विधानावर भाजपा संतापली, म्हणाले 'आधुनिक मीर जाफर...'

भाजपाने संजय राऊतांची भाषा अत्यंत आक्षेपार्ह असल्याची टीका केली आहे. तसेच त्यांनी सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला धमकावल्याचा आरोप केला.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 04:44 PM IST | Updated: Oct 20, 2026, 04:49 PM IST
Image Credit: 'अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले,' संजय राऊतांच्या विधानावर भाजपाची टीका
Join

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत, अल्बेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाला जाळल्याच्या घटनेचा उल्लेख केला. मात्र त्यांच्या या पोस्टवरुन भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर अराजकता पसरवल्याचा आरोप करत माफीची मागणी केली आहे.

संजय राऊतांच्या पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

"अल्बेनियाच्या जनतेने सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले आहे. सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्यामुळे जनता संतप्त होती. आंदोलक जनतेने संसद, सरकारी कार्यालये आणि मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले केले आहेत. सर्व देशांनी, विशेषतः भारताने, या घटनांतून धडा घेतला पाहिजे," असं संजय राऊतांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोबत त्यांनी व्हिडीओही जोडला आहे.

यानंतर भाजपाने राऊतांवर सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाला धमकावल्याचा आरोप केला. त्यांची भाषा अत्यंत आक्षेपार्ह आहे अशी टीका करत भाजपचे प्रवक्ते सी. आर. केशवन यांनी राऊत यांना 'आधुनिक मीर जाफर' असे संबोधले. केशवन म्हणाले, "संजय राऊत यांची भाषा एखाद्या आधुनिक मीर जाफरसारखी आहे; ते भारताच्या घटनात्मक संस्थांविरुद्ध आणि जनतेच्या जनादेशाविरुद्ध विश्वासघातकी भाषेचा वापर करत आहेत. संजय राऊत यांनी वापरलेली ही आक्षेपार्ह आणि समर्थनापलीकडील भाषा भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण करते. हे राहुल गांधी आणि त्यांच्या इकोसिस्टमच्या त्या घातक 'आणीबाणीच्या मानसिकते'चेच दर्शन घडवते."

 

 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी असा आरोप केला की, राऊत हे अल्बेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाला जाळण्याच्या कृतीचे समर्थन करत आहेत. तसेच, त्यांनी राऊत यांच्यावर वारंवार घटनात्मक संस्थांना लक्ष्य केल्याचाही आरोप केला. "त्यांना अराजकता हवी आहे. आधी त्यांनी राष्ट्रपतींचा, त्यानंतर निवडणूक आयोगाचा आणि मग सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा अपमान केला व त्यांना शिवीगाळ केली. आता त्यांना सर्वोच्च न्यायालय जाळून टाकायचे आहे. भारतातील जनता अराजकता सहन करणार नाही. संजय राऊत यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रलंबित आहे आणि त्यांना तिथेच त्याचे उत्तर मिळेल," असे त्यांनी म्हटले.

 

 

राऊतांनी विधानावर दिलं स्पष्टीकरण

भाजपाने संजय राऊतांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी अशी मागणीही केली आहे. दरम्यान या टीकेनंतर राऊतांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आणि सर्वोच्च न्यायालयावर आपला विश्वास असल्याचे ठामपणे सांगितले. "जर हे सरकार सत्तेत राहिले, तर अराजकता नक्कीच पसरेल; मला हेच म्हणायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे आणि केवळ सर्वोच्च न्यायालयच देशाला वाचवू शकते. जर आपण आपल्याच देशात तिरंगा फडकवू शकत नसू, तर मग आपण काय करू शकतो? यामुळे अराजकता निर्माण होईल. सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष दिले पाहिजे," असे राऊत म्हणाले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES