• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'हे' दोन नेतेच फायद्यात; राऊतांचं विधान! ना पार्थ, ना सुनेत्रा, ना तटकरे मग कोणाची घेतली नावं?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'हे' दोन नेतेच फायद्यात; राऊतांचं विधान! ना पार्थ, ना सुनेत्रा, ना तटकरे मग कोणाची घेतली नावं?

शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भातील चौकशीसाठी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केल्यापासून ते प्रफुल्ल पटेल शरद पवारांना प्रत्यक्षात भेटून येईपर्यंतच्या घटना चर्चेत असतानाच विलिनीकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 07, 2026, 11:24 AM IST|Updated: Nov 07, 2026, 11:43 AM IST
joinshare
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'हे' दोन नेतेच फायद्यात; राऊतांचं विधान! ना पार्थ, ना सुनेत्रा, ना तटकरे मग कोणाची घेतली नावं?
Image Credit: दोन्ही राष्ट्रवादींसंदर्भात केलं भाष्य (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मोस्ट वाँटेड हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक; सलमान, रोहित शर्मा, रणवीर सिंगला धमकावणारा हा गँगस्टर आहे तरी कोण?

मोस्ट वाँटेड हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक; सलमान, रोहित शर्मा, रणवीर सिंगला धमकावणारा हा गँगस्टर आहे तरी कोण?

2

'मेहता प्रकाशन'चा आधारवड हरपला! संस्थापक अनिल मेहतांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

3

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'हे' दोन नेतेच फायद्यात; राऊतांचं विधान! ना पार्थ, ना सुनेत्रा, ना तटकरे मग कोणाची घेतली नावं?

4

कंटेटच्या नादात प्रायव्हसीच विसरला, गोव्यात पत्नीचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने काढला, लोकप्रिय युट्यूबर ट्रोल

5

नातवाचा मृत्यू, पुजाऱ्यानेच काळी-जादू केल्याचा संशय, रागाच्या भरात शेजाऱ्यानेच केला भयंकर प्रकार, दोन मुलांसोबत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शरद पवार हे सत्ताधारी एनडीएसोबत जाणार, दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार यासंदर्भातील चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये सुरु असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या बातम्या निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. "मी वारंवार सांगत आहे की शरद पवार यांच्याविषयी ज्या बातम्या सातत्याने प्रसारित केल्या जात आहेत. मोदींचा फोन आला मग ते अमुक बोलले.  देश सांभाळू म्हणाले. मग पक्ष का फोडले? या सगळ्या बातम्या दुर्ललक्षित कराव्यात. त्या निरर्थक आहेत. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी त्यांची (शरद पवारांची) विचारधारा आहे. त्यात कोणतीही गडबड झाली नाही, होणार नाही," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या भेटीसंदर्भातही राऊत यांनी माहिती दिली.

कोणीही सत्ताधाऱ्यांसोबत जाणार नाही; राऊतांना विश्वास

"काल आम्ही भेटलो. चर्चा करतील अशी त्यांची प्रकृती नाही. उपचार सुरू आहेत. ज्या बातम्या आहेत त्या त्यांच्या अंतर्गत विषय आहेत. आता अजित पवार गट काय बोलतो हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला कोण विचारत नाही. त्यामुळे पवार यांच्या नेतृत्वात येत आहेत. तुम्हाला मान्यता मिळावी म्हणून पवार साहेब जातील त्यांच्यात असे वाटत नाही. अनेक जणांवर जाळे टाकण्यात येते पण कोणी त्यात फसत नाहीये. द्रमुकने सांगितले आहे की आम्ही येणार नाही. आम्ही सुद्धा जाणार नाही," असं राऊत यांनी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा करताना म्हटलं.

राष्ट्रवादीच्या दोनच नेत्यांना फायदा झाल्याचा राऊतांचा दावा

अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं असतं या सुनील तटकरेंच्या विधानावर बोलताना, "त्यांना असे का म्हणायला लागत आहे? ते जिथे आहेत ते तिथे अडकले आहेत. हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल यांना फायदा झाला आहे. आता पक्षाची सूत्र पार्थ पवार यांच्याकडे आहेत. त्यांच्यासोबत त्यांना काम करावे लागेल. पार्थ पवार जर त्यांना विचारत घेत असतील तर ते त्यांच्या पद्धतीने पक्ष चालवतात आहेत. त्यांच्या काही दिशा असू शकतात. त्यांना नवीन पिढी आणायची असेल. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा अधिकार आहे.  पवार साहेब हे पूर्ण वेळ राजकारणी आहेत.  60 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी महाराष्ट्र राजकारण पहिले आहे," असं संजय राऊत म्हणाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sanjay Raut
Sharad Pawar
Sunil Tatkare