SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा संदर्भ देत फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं! राऊत म्हणाले, '...तोपर्यंत राष्ट्रपती राजवट लावण्याचा विचार करावा!'

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यावरुन विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवरुन जुन्या प्रकरणांचा संदर्भ दिल्याचं ऐकल्यानंतर संजय राऊत चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. नेमकं ते काय म्हणाले जाणून घ्या

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 19, 2026, 11:38 AM IST | Updated: Oct 19, 2026, 11:51 AM IST
Image Credit: राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Join

अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. "देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासूनचा काळ बघितला तर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झाला आहे.  गँगवॉर, धमक्या, खंडणी हा 90 चा काळ पुन्हा एकदा फडणवीस-शिंदे-पवार यांच्या काळात पाहायला मिळतोय," असं राऊत यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपती राजवट लावण्याचा विचार करावा

"बाबा सिद्दीकी, पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या झाली.  या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा असा आम्ही सांगतो. यांना फक्त विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवायला गृह विभाग पाहिजे," असा टोला राऊत यांनी लगावला आहे. "राज्य चालवता येत नाही तोपर्यंत राष्ट्रपती राजवट लावण्याचा राज्यपालांनी विचार करावा," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांची विरोधकांवर टीका

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांकडून या विषयावरुन राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यावरुन मनसुख हिरेन प्रकरणाची आठवण करुन दिली. "विरोधक ज्यावेळी टीका करतात त्यावेळी त्यांनी मागे वळून बघितलं पाहिजे. हे तेच लोक आहेत त्यांच्या काळामध्ये पोलिसांच्या मदतीने शासन स्पॉन्सर अशा पद्धतीने देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला," असा टोला फडणवीसांनी लगावला. "मनसुख हिरेन यांची हत्या ते कदाचित विसरले आहेत. ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये घोटाळे झाले. सीबीआयने ते घोटाळे बाहेर काढले. त्याचे सगळे टेलिफोन टॅपिंग आलं. त्यात संपूर्ण वार्तालाप आला या सगळ्या गोष्टी ते विसरले असतील म्हणून बोलत असतील," असं फडणवीस म्हणाले. यावरुन प्रश्न विचारला असता राऊत चांगलेच संतापले. 

राऊत संतापून काय म्हणाले? 

"तू मागचं काय सांगोतोस? तू मुख्यमंत्री आहे ना? यांचं मानसिक स्वास्थ बिघडलयं वाटतं. यांचा गजनी झालाय," असं राऊत म्हणाले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी, "मेंदूला बधिरता आलीय. निर्घृण मनाने तुम्ही बारा वर्ष काय करताय? मागील पाच वर्ष तुमचं राज्य आहे. ज्ञानेश कुमार यांनी तुम्हाला निवडून दिलाय ना? हे ज्ञानूचं सरकार आहे. त्यानुसार ते वागत आहेत. तुमच्या अपयशावर बोला. त्यावर तुम्ही बोला मुख्यमंत्री आहात ना? तिरंगा लहरवणाऱ्यांना अटक करता. हातभर फाटली तुमची," अशी टीका राऊत यांनी केली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES