SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'तुम्ही महिलांना कशा अश्लील...', भाजपाची संजय राऊतांवर सडकून टीका; 'टू व्हीलरवर...'

राज्यसभा खासदार तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधताना भारतीय जनता पार्टीने नेमकं काय म्हटलंय आणि कोणी हे विधान केलंय जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 07, 2026, 12:55 PM IST | Updated: Nov 07, 2026, 01:08 PM IST
Image Credit: खोचक शब्दांमध्ये राऊतांना लगावला टोला (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - 'पीटीआय'वरुन साभार)
Join

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊतांवर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात बोलताना अनेक पक्षांसाठी सत्ताधाऱ्यांकडून जाळी टाकली जात असल्याचं विधान केलं. यावरुनच डिलिमिटेशन विधेयकाचा संदर्भ देत बन यांनी राऊतांना सुनावलं असून महिला सशक्तीकरणाच्या मुद्याबद्दल बोलताना 'पाटकर' प्रकरणाचा उल्लेखही केला आहे. 

राऊत काय म्हणाले?

शरद पवार हे सत्ताधारी एनडीएसोबत जाणार, दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार यासंदर्भातील चर्चांबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, "मी वारंवार सांगत आहे की शरद पवार यांच्याविषयी ज्या बातम्या सातत्याने प्रसारित केल्या जात आहेत. मोदींचा फोन आला मग ते अमुक बोलले.  देश सांभाळू म्हणाले. मग पक्ष का फोडले? या सगळ्या बातम्या दुर्ललक्षित कराव्यात. त्या निरर्थक आहेत. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी त्यांची (शरद पवारांची) विचारधारा आहे. त्यात कोणतीही गडबड झाली नाही, होणार नाही," असा विश्वास पत्रकारांसमोर व्यक्त केला. याचसंदर्भातून पुढे, "तुम्ही (अजित पवारांच्या पक्षाचे नेते) जिथे आहात तिथे तुम्हाला कोण विचारत नाही. त्यामुळे ते पवार यांच्या नेतृत्वात येत आहेत. तुम्हाला मान्यता मिळावी म्हणून पवार साहेब जातील त्यांच्यात असे वाटत नाही. अनेक जणांवर जाळे टाकण्यात येते पण कोणी त्यात फसत नाहीये. द्रमुकने सांगितले आहे की आम्ही येणार नाही. आम्ही सुद्धा जाणार नाही," असं राऊत यांनी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा करताना म्हटलं. 

राऊतांवर निशाणा

आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत जाणार नाही या राऊत यांच्या विधानावरुन बन यांनी खोचक टीका करताना, "लोकसभेत संजय राऊत यांच्या पक्षाचे खासदार किती? टू व्हीलरवर बसतील एवढे दोन खासदार आहेत," असं म्हटलं. तसेच, "डिलिमिटेशन विधेयक हे मंजूर होईल. महिलांचा सन्मान करण्याचा काम पंतप्रधान मोदी करतील. तुम्ही महिलांना कशा अश्लील भाषेत बोलतात हे पाटकर फाईल्स माध्यमातून दिसतंय," असा टोला बन यांनी लगावला आहे.  "2019 ला सत्तेसाठी लाचार कोण झालं? 2019 ला भाजप-सेना युतीला जनतेने समर्थन दिलं होतं. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. तेव्हा तुम्ही लोकशाहीचा गळा दाबला होता," अशी टीका बन यांनी केली.

फडणवीसांची शेतकऱ्यांसहीत दिवाळी

"दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आहेत. आम्ही घरी बसून दिवाळी साजरी करत नाही. आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली नाही तशी दिवाळी मुख्यमंत्री साजरी करणार आहेत," असं नवनाथ बन म्हणाले.  

...तर गोकुळमध्ये फेरनिवडणूक

"गोकुळ निर्णयाबद्दल प्रकाश आबिटकर यांची भूमिका काय? 'गोकुळ'च्या नियमनुसार 14 जण जमणार नाही तोपर्यंत 'गोकुळ'ची बैठक घेता येत नाही.  
14 लोक न सतेज पाटील यांच्याकडे आहेत. ना महायुती कडे 14 आहेत. महिनाभरात जर अध्यक्ष बसला नाही तर 6 महिने प्रशासक बसेल. नंतर पुन्हा फेरनिवडणूक होईल. 10 तारखेला बैठक बोलवली आहे. 4 जणांचा समावेश होईल. कोरम पूर्ण होईल अध्यक्ष निवडला जाईल," असं बन यांनी गोकुळसंदर्भातील पेचावर भाष्य करताना म्हटलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES