• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे व्याजासह वसूल करणार? व्हायरल व्हिडीओवर सरकारचं स्पष्टीकरण

अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे व्याजासह वसूल करणार? व्हायरल व्हिडीओवर सरकारचं स्पष्टीकरण

लाडकी बहीण योजनेबाबत एक दावा प्रसारित होतोय. यात पात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे व्याजासह वसूल केले जातील, असं व्हिडिओत म्हटलं आहे. काय आहे या दाव्यामागील सत्यता.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 07, 2026, 12:46 PM IST|Updated: Nov 07, 2026, 12:48 PM IST
joinshare
अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे व्याजासह वसूल करणार? व्हायरल व्हिडीओवर सरकारचं स्पष्टीकरण
Image Credit: Ladki Bahin Yojana fake news recovery rules 2026

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे व्याजासह वसूल करणार? व्हायरल व्हिडीओवर सरकारचं स्पष्टीकरण

अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे व्याजासह वसूल करणार? व्हायरल व्हिडीओवर सरकारचं स्पष्टीकरण

2

'आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली असं...', 'राऊत काँग्रेसमध्ये जाणार का?' कोणी केला हा सवाल?

3

मोस्ट वाँटेड हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक; सलमान, रोहित शर्मा, रणवीर सिंगला धमकावणारा हा गँगस्टर आहे तरी कोण?

4

'मेहता प्रकाशन'चा आधारवड हरपला! संस्थापक अनिल मेहतांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

5

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'हे' दोन नेतेच फायद्यात; राऊतांचं विधान! ना पार्थ, ना सुनेत्रा, ना तटकरे मग कोणाची घेतली नावं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय योजना लाडकी बहीण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत असा दावा करण्यात आला आहे की, लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे व्याजासह वसूल केले जातील. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या डीजीआयपीआरने हा दाव्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हा दावा खोटा असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

व्हिडिओत नेमकं काय म्हटलंय?

किसान हेल्पलाइन नावाच्या युट्यूब चॅनेलवर 5 नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यात थंबनेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असून त्यांच्या हातात शासन निर्णयाची प्रत आहे. तसंच, पुढे लिहलं आहे की, महिलांसाठी सर्वात कडक नियम लागू. घरोघरी महिलांची तपासणी सुरू. महिलांकडे ही वस्तु असेल तर थेट जेल होणार, अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे.

व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकारने जीआर काढून राज्यातील सर्व महिलांसाठी पाच कडक नियम लागू केले आहेत. घरोघरी गुप्त तपासणी सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे व्याजासह वसूल केले जातील.

मात्र या व्हिडिओत करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. राज्य शासनाने 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत असा कोणताही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

किसान हेल्पलाइन या यूट्यूब चॅनलवर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकारने जीआर काढून राज्यातील सर्व महिलांसाठी पाच कडक नियम लागू केले आहेत. घरोघरी गुप्त तपासणी सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे व्याजासह वसूल केले जातील, असे व्हिडिओत सांगितले आहे. हा दावा खोटा आहे. #FactCheck #DGIPRFactCheck लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत असा कोणताही शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही. #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 6, 2026

तसंच, या व्हिडिओत आणखी एक दावा करण्यात आला आहे की, राज्यातील सर्व लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन गुप्त पडताळणी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे कागदपत्रे, आर्थिक परिस्थिती आणि पात्रतेशी संबंधित माहिती तपासली जात असल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे. या दाव्यामुळं अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. मात्र सोशल मीडियावर प्रसारित झालेला या व्हिडिओतील दावा पूर्णपणे खोटा आहे. तसंच, सरकारी पडताळणीच्या नावाखाली कोणी कागदपत्राची पडताळणी करायला आल्यास संभाव्य फसवणुकीपासूनसावध राहावे, असं अवाहन करण्यात आले आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Maharashtra Politics