• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली असं...', 'राऊत काँग्रेसमध्ये जाणार का?' कोणी केला हा सवाल?

'आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली असं...', 'राऊत काँग्रेसमध्ये जाणार का?' कोणी केला हा सवाल?

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं असतानाच यावरुन आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जुंपल्याचं दिसत आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 07, 2026, 12:15 PM IST|Updated: Nov 07, 2026, 12:28 PM IST
joinshare
'आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली असं...', 'राऊत काँग्रेसमध्ये जाणार का?' कोणी केला हा सवाल?
Image Credit: राऊतांबद्दल कोणी केलं हे विधान? (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली असं...', 'राऊत काँग्रेसमध्ये जाणार का?' कोणी केला हा सवाल?

'आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली असं...', 'राऊत काँग्रेसमध्ये जाणार का?' कोणी केला हा सवाल?

2

मोस्ट वाँटेड हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक; सलमान, रोहित शर्मा, रणवीर सिंगला धमकावणारा हा गँगस्टर आहे तरी कोण?

3

'मेहता प्रकाशन'चा आधारवड हरपला! संस्थापक अनिल मेहतांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

4

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'हे' दोन नेतेच फायद्यात; राऊतांचं विधान! ना पार्थ, ना सुनेत्रा, ना तटकरे मग कोणाची घेतली नावं?

5

कंटेटच्या नादात प्रायव्हसीच विसरला, गोव्यात पत्नीचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने काढला, लोकप्रिय युट्यूबर ट्रोल

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं असतानाच यावरुन आता सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि विरोधात असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवार इंडिया आघाडीसोबतच राहतील. दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार नाही. झालं तरी इतर नेते पवारांसोबत म्हणजेच इंडिया आघाडीकडे येतील असं राऊत यांनी पत्रकारांशी चर्चा करताना म्हटलं. यावरुन निशाणा साधताना भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी थेट राऊत आणि आदित्य ठाकरेंमध्ये शिवसेनेत अंतर्गत संघर्ष सुरु असल्याचं ऐकिवात आल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार संजय राऊतांच्या माध्यमातून निर्णय सांगणार नाहीत

"उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रति पक्षप्रमुख संजय राऊत आहेत. तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन करणार? शरद पवार आपला निर्णय संजय राऊत यांच्या माध्यमातून सांगणार नाहीत.  विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा की नाही हे ठरवायला सुनेत्रा पवार या सक्षम आहेत. त्या जो निर्णय घेतील त्याला भाजपचा पाठिंबा असेल," असं नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधताना म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार नाही असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावरुनच बन यांनी हा टोला लगावला आहे. एवढ्यावरच न थांबताना राऊत काँग्रेसमध्ये जाणार असा सवाल बन यांनी केला आहे.  

आदित्य ठाकरे आणि राऊत असा सामना

"आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतोय. आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची कॉलर पकडली असं बातम्यांमध्ये आलं होतं. त्यांना कंटाळून संजय राऊत काँग्रेसमध्ये जाणार का?" अशा खोचक सवाल बन यांनी विचारला. तसेच राऊत यांना सल्ला देताना, "संजय राऊत यांनी विनाकारण विषय भरकटवू नये. त्यांचा बचत गट काँग्रेसमध्ये कधी विलीन करणार? याचा मुहूर्त कधी असणार," असा टोला लगावला.

गाढव नाक्यावर आंदोलन करण्याचा सल्ला

हसन मुश्रीफ यांच्या विरूद्धच्या खटल्यामध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट सादर केल्यानंतर हा खटला बंद करण्यात आल्यावरुन राऊतांनी केलेल्या टीकेवरही बन यांनी भाष्य केलं आहे. "संजय राऊत यांना हसन मुश्रीफ यांच्या विरोधात खटला सुरु ठेवायचा असेल तर त्यांनी पुरावे द्यावे कोर्टात. पुरावे सादर करून खटला सुरु ठेवावा. भांडुपच्या गाढव नाक्यावर तुम्ही या विरोधात आंदोलनाला बसा," असा टोमणा बन यांनी मारला.

अफजलखान, औरंगजेब हा तुमचा अजेंडा

"योगी आदित्यनाथ हिंदुत्व पुढे घेऊन जाताय त्याला संजय राऊत विरोध करत आहेत. तुमचा अजेंडा औरंगजेब फॅन क्लब चालवयाचा आहे.  अफजलखान, औरंगजेब हा तुमचा अजेंडा आहे," अशी टीका बन यांनी केली.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sanjay Raut
BJP
Aaditya Thackeray