• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /माधुरी दीक्षितवर केलेल्या टिप्पणीवरुन ट्रोल, संजय मोने यांनी पोस्ट चर्चेत, म्हणाले, 'तितकी तुमची लायकी...';

माधुरी दीक्षितवर केलेल्या टिप्पणीवरुन ट्रोल, संजय मोने यांनी पोस्ट चर्चेत, म्हणाले, 'तितकी तुमची लायकी...';

ज्येष्ठ मराठी अभिनेते संजय मोने यांच्या अलीकडच्या पोस्टमुळे सध्या मनोरंजनविश्वात चर्चा सुरू आहे. त्यांनी एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावर भाष्य केलं आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 07, 2026, 01:30 PM IST|Updated: Nov 07, 2026, 01:36 PM IST
joinshare
माधुरी दीक्षितवर केलेल्या टिप्पणीवरुन ट्रोल, संजय मोने यांनी पोस्ट चर्चेत, म्हणाले, 'तितकी तुमची लायकी...';
Image Credit: sanjay mone giver replay to trollers over madhuri dixit kon honar karodpati post

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
माधुरी दीक्षितवर केलेल्या टिप्पणीवरुन ट्रोल, संजय मोने यांनी पोस्ट चर्चेत, म्हणाले, 'तितकी तुमची लायकी...';

माधुरी दीक्षितवर केलेल्या टिप्पणीवरुन ट्रोल, संजय मोने यांनी पोस्ट चर्चेत, म्हणाले, 'तितकी तुमची लायकी...';

2

बंगळुरू सामूहिक हत्याकांडात धक्कादायक ट्विस्ट; 7 जणांसोबत अजून 2 जणांच्या हत्येचा होता कट, त्या अल्पवयीन मुलीने...

3

'तुम्ही महिलांना कशा अश्लील...', भाजपाची संजय राऊतांवर सडकून टीका; 'टू व्हीलरवर...'

4

अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे व्याजासह वसूल करणार? व्हायरल व्हिडीओवर सरकारचं स्पष्टीकरण

5

'आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर पकडली असं...', 'राऊत काँग्रेसमध्ये जाणार का?' कोणी केला हा सवाल?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते, लेखक संजय मोने सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ते सोशल मीडियावर पोस्ट विविध विषयांवर मत व्यक्त करत आहेत. अलीकडेच त्यांनी माधुरी दीक्षित यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. त्यानंतर काही जणांनी त्यावर सहमती दर्शवली तर काहींनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. मात्र या सगळ्यावर पुन्हा एकदा संजय मोने यांनी पोस्ट करत भाष्य केलं आहे.

संजय मोने यांनी माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनाच्या सादरीकरणाबाबत पोस्ट केली होती. तसंच, त्यांनी त्यावेळी मराठीतील एक म्हण देखील वापरली होती. तसंच, सचिन खेडेकर सचिन खेडेकर तोच कार्यक्रम अप्रतिम सादर करायचे, असंही म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. काहींनी त्यांच्या पत्नी सुकन्या मोने यांनाही यावादात ओढत त्यांच्यावर टिप्पणी केली. यासगळ्यावरं संजय मोने यांनी मिश्किल शब्दांत टोला लगावत ट्रोलर्सला प्रतिक्रिया दिली आहे.

संजय मोने यांची पोस्ट काय?

'परवा एक नोंद मी लिहिली त्यात बच्चन साहेब आणि माधुरी बाई साहेब यांच्या बद्दल लिहिलं होतं. मला त्यात दोघांच्याही बद्दल कलाकार म्हणून काहीही गैर लिहायचं नव्हतं. प्रश्न फक्त सादर करण्याबद्दल होता. माधुरी बाईंच्या दिसण्यात काहीही उणीव काढताच येत नाही. त्या उत्तम अभिनेत्री आहेत पडद्यावर सर्वोत्कृष्ट नृत्य सादर करतात. पण ज्या लोकांनी माझ्यावर भरघोस टीका केली त्यात माझ्या एकंदर लायकी बद्दल असंख्य प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल मला फक्त हसायला आले,' असं संजय मोने यांनी म्हटलं आहे.

'काही लोकांनी माझ्या मुलीबद्दल "तिला करायला सांगा हा कार्यक्रम "असाही  प्रश्न उपस्थित केला माझ्या पत्नीबद्दल ही काहीबाही लिहिलं. माझी पत्नी माझ्याहून जास्त लोकप्रिय आहे, असं ही लिहिलं त्यामुळे मी चिडून काही प्रत्युत्तर करेन असंही त्यांना वाटलं. पण ती जास्त लोकप्रिय आहे आणि अधिक गुणी आहे हे मी 27 वर्षांपूर्वी मान्य केलं आहे आणि काही लोकांनी माझ्या मुलीला तिने कार्यक्रम करायला सांगा असा ही प्रश्न उपस्थित केला. त्याबद्दल उत्तर माझी मुलगी आपल्या सगळ्यांच्या मनातही येणार नाही अश्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन सध्या ऑस्ट्रेलिया येथे नोकरी करत आहे,' असं प्रत्यत्तर संजय मोने यांनी दिलं आहे.

'त्या आधी ती माननीय प्रकाशबाबा आमटे यांच्याकडे दीड महिना राहून आली आहे. जिथे नो मॉल ,नो macdonald, नो मुव्ही ही परिस्थिती होती. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊनही मराठी बोलतांना तुम्ही ऐकणा-या कुठल्याही कलाकारासारखं तिच्या वाक्याची सुरुवात 'सो' ह्या शब्दांनी होत नाही. तिला हवं ते अधिक शिक्षण घेऊन मायदेशी येण्याची तीव्र इच्छा आहे. पण तिच्या शिक्षणाचा उपयोग इथे आजतरी किंवा नजीकच्या भविष्यात नाही,'असंही त्यांनी म्हटलं आहे.

'माझ्या लायकीबद्दल ज्यांनी लिहिले आहे त्यांना एकदाच उत्तर देऊन त्यांची कीव करावी ही ही त्यांची "लायकी"नाही पण. मी 42 वर्ष या व्यवसायात आहे. 60 नाटकं, 40 चित्रपट आणि 30 मालिका, 9 चित्रपट लेखन 7 नाटकांच लेखन केलं आहे. 100 हजार स्तंभ लेखन केलं आहे. मला शिव्या देणा-या लोकांना हेच सांगायचं आहे की समोरच्या माणसाने आपलं मत मांडल तर त्याला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार अगदीच मान्य आहे पण तितकी तुमची लायकी असली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यातली एकही व्यक्ती मला तरी नामवंत वाटली नाही,' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'आता राहिला शेवटचा प्रश्न "तुम्ही एकदा KBC सारखा कार्यक्रम करून दाखवा "तर मी मराठीत "कानाला खडा "नावाचा कार्यक्रम करून दाखवला आहे. शिवाय इतरही कार्यक्रमांच सूत्र संचालन केलं आहे. या उप्पर आता हा विषय मी संपवला आहे कारण ज्यांनी ज्यांनी लिहील आणि ते लिहितांना जितके  शब्द वापरले तितक्या संख्येची पुस्तक मी वाचलेली आहेत,' असं संजय मोने यांनी म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
Madhuri Dixit
News in Marathi