SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शाहिद कपूर, सोनाक्षी सिन्हाचा ड्रायव्हर, नंतर बनले मुंबईचे मोमोज किंग; आता तुकाराम मुंढेंनी केलं दुकान बंद

कधी काळी बॉलिवूड सेलिब्रिटीजचे ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या मोमो किंगच्या अस्थापनावर एफडीएने धाड टाकली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 07, 2026, 02:14 PM IST | Updated: Oct 07, 2026, 02:16 PM IST
Image Credit: Suraj Lama Momos FDA action
Join

मोमो हे आता सगळ्यांचे आवडते फास्ट फुड झाले आहे. अनेक मोठ्या रेस्तराँमध्ये मोमो दिले जातात. इतकंच नव्हे तर, खाऊगल्लीमध्येही मोमोचे स्टॉल असतात. मुंबईत सूरज लामा मोमोज हे प्रसिद्ध फुड जॉइंट आहे. मात्र हेच फूड जॉइंट आता एफडीएच्या रडारवर आले आहे. मात्र आता चर्चा आहे ती या सूरज लामा मोमोजच्या मालकाची. कधीकाळी सेलिब्रेटीजचा ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने हे रेस्तराँ सुरू केला आहे.

सूरज लामा मोमोज हा ब्रँड इतका लोकप्रिय असतानाच महाराष्ट्र FDAने कारवाई केली आहे. रिपोर्टनुसार, एफडीएने सणासुदीच्या दिवसांत सुरू केलेल्या मोहिमेत सूरज लामा मोमोसह आठ अस्थापनांवर धाड टाकत परवाना निलंबित केला आहे. एफडीएने अस्वच्छता, खाद्यपदार्थ हाताळणी आणि साठवणुकीच्या पद्धतींमध्ये निष्काळजीपणा आढळला तसंच, खाद्यपदार्थांचा साठा आणि स्वच्छतेची रसायने एकाच ठिकाणी ठेवल्याचे समोर आले.

'सूरज लामा मोमोज'  च्या आउटलेट्सवर अन्न व औषध प्रशासनकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रामुळे एफडीएने त्यांच्या 7 बंगलोज आणि कंट्री क्लब  या दोन्ही आउटलेट्सचे अन्न परवाने निलंबित केले आहेत.

सूरज लामाचे बॉलिवूड कनेक्शन

सूरज यांनी शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचे ड्रायव्हर म्हणून काम केले आहे. 2017 मध्ये त्यांनी नोकरी सोडून अंधेरीमध्ये सायकलवर मोमोज विकण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता 'मोमोज किंग' म्हणून प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या आउटलेट्सवर अनेक सेलिब्रिटी देखील येतात.

सूरज लामा हे मुळचे दार्जिलिंगमधील मिरिक गावचे रहिवाशी असून रोजगाराच्या शोधात ते 14 वर्षांचे असताना मुंबईत आले. त्यांनी साधारणपणे 25 वर्षे सेलिब्रिटी ड्रायव्हर म्हणून काम केले. 2017मध्ये त्यांनी अॅपवर आधारित कॅब सर्व्हिस चालवायला सुरुवात केली. सूरजने 2017मध्ये त्यांची नोकरी सोडली आणि मोमोचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी त्यांची बाईकदेखील विकली अन् सायकलवर मोमो विकण्यास सुरुवात केली.

मुंबईत त्या काळी आत्तासारखे मोमो मिळत नव्हते. सूरजने याच संधीचा फायदा घेतला. अंधेरी वेस्टच्या वेगवेळ्या भागात सायकलवर फिरून मोमो विकायचे. पाहता पाहता मोमोची मागणी वाढली. त्यानंतर त्याने वर्सोवा येथे त्यांचे पहिले आउटलेट काढले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES