टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात शॉकिंग ट्विस्ट! राधाविषयी एक्स नवऱ्याने दिली धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील राधाविषयी एक्स नवऱ्याने दिली धक्कादायक माहिती दिली आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन महिलांना दिल्लीत अटक केली आहे. यामध्ये राधा आणि बबिता यांचा समावेश आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबार प्रकरणाशी दोन महिलांना दिल्लीत अटक करण्यात आली. यामध्ये राधा आणि बबिता यांचा समावेश आहे. राधाबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राधाच्या माजी पतीने एएनआयला यासंदर्भातील प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या दोघांचा आता काहीच संबंध नसल्याने त्याने स्पष्ट केलं.
माझा तिच्याशी काहीही संबंध नाही”
राधाचा माजी पती सुनील याने सांगितलं की, “ती पूर्वी माझी पत्नी होती, पण आता आमचा कोणताही संपर्क किंवा नाते राहिलेलं नाही. अनेक वर्षांपूर्वीच आमचा संपर्क तुटला होता. ती सध्या काय करते, कोणत्या गैरकृत्यात सामील आहे किंवा कुठे राहते, याबद्दल मला काहीही माहिती नाही. ती घर सोडून गेल्यापासून आमची भेट झालेली नाही.
2015 मध्ये झालं होतं लग्न
सुनीलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा विवाह २०१५ मध्ये झाला होता. त्यांना एक मूलही झाले. मात्र, लग्नानंतर सुमारे दीड वर्षांनी ती एका रात्री अचानक घर सोडून निघून गेली आणि तेव्हापासून ती परतली नाही.
राधा बेपत्ता झाल्यानंतर सुनीलने तिचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि न्यायालयात कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली होती, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर दोन ते तीन वर्षांनंतर त्याने दुसरे लग्न केलं. सुनीलने पुढे सांगितलं की, “ती जोपर्यंत माझ्यासोबत राहत होती, तोपर्यंत तिने कधीही कोणताही त्रास दिला नाही किंवा कोणतेही वाद घातले नाहीत. ती नीट राहत होती, पण घर सोडल्यानंतर ती काय करत होती, याची मला कल्पना नाही.” टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील शस्त्र पुरवठा नेटवर्कशी नाव जोडले गेल्याने आणि पोलीस कारवाईमुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; दिल्लीत पोलिसांकडून चौघांना अटक
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी दिल्लीत पोलिसांकडून चौघांना अटक केली. आरोपींना मुंबईत न्यायालयात हजर करणार आहेत. कुणाल (२१) आणि सुमित (१९, दोघेही रा. हरियाणा), राधा (२३) आणि बबिता (२३, दोघीही रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कुणाल नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्राने त्याची ओळख अनिल पंडितशी करून दिली. अनिल पंडित हा मूळचा पानिपतचा असून, तो सध्या अमेरिकेतून गुन्हेगारी कारवाया चालवतो.