SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

फक्त अर्थखातं नको तर..., राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली! मंत्रिमंडळ बदललं जाण्याची शक्यता

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 9 पैकी 5 मंत्री बदलण्याची शक्यता आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 25, 2026, 11:16 AM IST | Updated: Oct 25, 2026, 11:30 AM IST
Image Credit: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली
Join

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सुनेत्रा पवार) गोटात सध्या वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. पक्षामध्ये पक्षात मंत्रिमंडळ बदलाचे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडली असून, त्यात यासंदर्भात चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनजय मुंडे उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी दिल्तीत बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांची बुधवारी दिल्लीत बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांची देखील बैठक पार पडली होती. बैठकीमधे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असून, नव्या चेहऱ्यांना सुनेत्रा पवार संधी देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. अर्थ खात्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. अर्थ खात्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची वरिष्ठ नेत्याची माहिती आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) खालील 9 मंत्री समाविष्ट आहेत:

1. हसन मुश्रीफ
2. धनंजय मुंडे
3. आदिती तटकरे
4. दत्तात्रय भरणे
5. नरहरी झिरवाळ
6. माणिकराव कोकाटे
7. मकरंद जाधव पाटील
8. बाबासाहेब पाटील
9. इंद्रनील नाईक

छगन भुजबळ यांनी फेटाळलं वृत्त

दरम्यान छगन भुजबळ यांनी 5 मंत्री बदलणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. आपण अर्थखात्यासाठी आग्रही असून, तीच मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तसंच सध्या दुष्काळ पडला असल्याने मदतीसंदर्भात निर्णय घेण्याचे असल्याने अर्थखातं लगेच मिळणार नाही असं स्पष्ट करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही तारीख दिली नसल्याचं म्हटलं आहे. हे सांगताना त्यांनी आम्हाला अर्थखातं सोडून इतर कोणतंही नको यावर जोर दिला.

अर्थखात्यासंदर्भात आम्ही सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इतर काही विषयांवरही चर्चा झाली. आमचं जे अर्थखातं ते लवकरात लवकर पुन्हा दिल जावं अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी सकारात्मकता दर्शवली असून, तुम्हाला ते दिलं जाईल असं सांगितलं आहे. अर्थसंकल्प मांडण्याआधी ते दिलं जाण्याची शक्यता आहे असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. आमची युती फक्त महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेशी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Add Zee News as a Preferred Source

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES