राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) संस्थापक शरद पवार रुग्णालयात दाखल असून गुरुवारी प्रफुल्ल पटेल त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरणासंदर्भातील चर्चांना वेग आला आहे. यादरम्यान सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची सध्या तरी कुठलीच चर्चा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हे सांगताना त्यांनी, अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसले असते असंही म्हटलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची रुग्णालयात भेट घेणं काही गैर नाही. त्यावेळी नेमकी काय राजकीय चर्चा झाली यापेक्षा तब्बेतीची विचारपूस महत्वाची आहे. त्या 10 तारखेबाबत मला काही माहिती नाही आणि नेमकी कुठली 10 तारीख हे समजलं तर त्यावर बोलता येईल असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.
शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा