'रक्तबंबाळ झालेला ड्रायव्हर'; गोळीबार झाल्यानंतर काय होती टायगरची प्रतिक्रिया, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर रविवारी रात्री गोळीबार झालाय...मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्कजवळ दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केलाय
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांकडून 5 राऊंड फायर करण्यात आले. या हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला असून कारचालकासह प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालकदेखील जखमी झाला आहे. घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं? हे प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
प्रत्यक्षदर्शी महिला सलमा शेखने दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफची गाडी बाहेर येताच मच्छर सारखा सडपातळ मुलगा समोर आला आणि गाडीवर फायरिंग करायला सुरुवात केली. सलमा शेखने पुढे म्हटले की, आम्ही नेहमीप्रमाणे व्हॉग करत होतो. एकीकडे वाढदिवसाची पार्टी सुरू होते. आम्ही सगळेजण वाढदिवस साजरा करत होतो. पार्टी संपल्यानंतर आम्ही निघालो. तेव्हाचच एक मच्छरसारखा दिसणारा सडपातळ मुलगा. गरीब दिसणारा जसं की फुटपाथवर राहणारा एक मुलगा आला.
मुलाने टायगर श्रॉफच्या गाडीवर फायरिंग करायला सुरुवात केली. आधी सुरुवातीला सगळ्यांना वाटले की दिवाळीचे फटाके फोडण्यात येत आहेत. मात्र जेव्हा टायगरची गाडी थांबली आणि तो घाबरून बाहेर आला. त्यानंतर हल्लेखोर फायरिंग करुन पळून गेला. टायगरचा ड्र्रायव्हर गाडीतून बाहेर तेव्हा त्याच्या शरीरातून रक्त येत होतं.
दरम्यान, गोळीबारानंतर टायगर स्वतः कार चालवत जखमी चालकाला घेऊन रुग्णालयात पोहोचला होता. टायगरच्या या समयसूचकतेचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. तर, मुंबई पोलिसांच्या 15 पथकांकडून टायगरवरील हल्ल्याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिककडून टीमकडून घटनास्थळीची पाहणी करण्यात आली. तर एका संशयितांला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पंचनामा करण्यात येणार
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबाराच्या घटनेनंतर, घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींना पंचनामा आणि पुढील तपासासाठी जुहू पोलीस ठाण्यात आणले जात आहे.
हल्लेखोरांचा नवा व्हिडिओ आला समोर
तपास पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ दर रविवारी जुहू येथील पुष्पा पार्कमध्ये सुमारे दोन तास फुटबॉल खेळण्यासाठी येतो, याची हल्लेखोरांना पूर्ण माहिती होती. टायगर बाहेर येण्याची वाट पाहण्यासाठी दबा धरण्यापूर्वी आरोपींनी पार्कच्या बाहेरील परिसराची सविस्तर रेकी केली होती, या बाबीचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.