2019 नंतर काही जणांचा फोन थांबला, उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. 2019 नंतर काही जणांचा फोन थांबला असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या "बोध किर्तन" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच ज्येष्ठ पत्रकार लेखक अंबरीश मिश्र यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होतो?
'महाराष्ट्राची हास्यरेषा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली होती. उद्धव ठाकरे यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी वक्तव्य केले होते. 2019 पर्यंत उद्धव जींनी बोलावले तेव्हा तेव्हा मी गेलो. पण त्यानंतर त्यांनी काही बोलावले नाही. मी वाट पाहात राहिलो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. काही जणांचा फोन 2019 सालानंतर थांबला तो थांबला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरेंची फटकेबाजी
राज ठाकरे बोलल्यावर मुख्यमंत्री येतात. त्यामुळे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना बोलवत जावं, असं वक्तव्य मंत्री आशिष शेलारांनी केले. तर, 2029 पर्यंत मुख्यमंत्री ठेवा म्हणजे झालं, असं म्हणत शेलारांच्या विधानावर राज ठाकरेंनी मिश्किल टोला लगावला होता. संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी अनेक जुने किस्से सांगितले. तसेच संजय राऊत यांच्या लेखन शैलीचे कौतुक केले. शब्दांच्या ओव्या पण होतात आणि शिव्या पण होतात. हे संजय यांनी बरोबर साधले आहे. शिव्या कोणाला द्यायच्या आणि ओव्या कोणाला द्यायच्या हे कळाले पाहिजे.
काही दिवसांनी अक्षर आणि पेन हे म्युझियम मध्ये जाईल. पूर्वी एक शब्द होता बाई वेडा तसा आता मोबाईल वेडा झालं आहे. तुमचा गैरसमज आम्ही वाचतो कमी आम्ही वाचवतो जास्तं आणि मग वाचणं राहून जात. मराठी भाषिकांना नेमके काय पाहिजे हे अमरीश यांनी सांगितले.
मराठीचा आग्रह धरतो पण शुद्ध मराठी आली पाहिजे नाहीतर अर्थ काय त्याचा. ओव्याची सुरवात कुठून झाली बोध देणार कोणी राहिले नाही. या पुस्तकात अनुक्रमणिका नाही. कोणतही पान कधीही काढा.
पूर्वी दळण जात्यावर दळलं जायचं. तेव्हा ओव्या निर्माण व्हायच्या. पण जात गेलं आणि जाती राहिल्या आणि जातीवादी शिव्या आल्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.