मफलरवाला नेता कोण? रोहित पवार यांनी 2 बड्या नेत्यांची नावे घेतली; पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अजित पवार यांच्या अपघात\घातपातामागे असलेल्या वाचवणारा नेता कोण? याबाबत रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. यावेळी रोहित पवार यांनी 2 नेत्यांची नावे घेतली.
रोहित पवार : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवारांनी पुन्हा गंभीर सवाल उपस्थित केलेत. व्हीएसआर कंपनी आणि कंपनीच्या मालकाचा ज्या पद्धतीने तपास व्हायला हवा होता तसा तपास झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. हा अपघात नसून घातपात असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या अपघात\घातपातामागे असलेल्या वाचवणारा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी खळबळजवक दावा केला आहे. पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी 2 नेत्यांची नावे घेतली.
अजित दादांचा अपघात का घातपात याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विरोधात असूनही आम्ही दादांच्या विमान अपघाताचे खरं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे नाव मी घेतले. या दोघांनी त्यांनी फोन करुन थांबवले. ते कारने बारामतीला येणार होते. पण महत्वाची फाईल घ्यायचे असल्याचे सांगून त्यांना थांबवण्यात आले. दादांच्या दोन प्रमुख नेत्यांसाठी त्यांना मुंबईत थांबावे लागले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांमुळे अजित पवारांचा कारऐवजी विमानानं प्रवास करावा लागला. दोन्ही नेते भेटीसाठी उशिरा आल्यानं अजित पवारांना विमानानं प्रवास करावा लागला असा मोठा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दावा.
अजित दादांच्या विमान अपघाताचा FRI दाखल का केला नाही?
अजित दादांच्या विमान अपघाताचा FRI दाखल करावा अशी मागणी होती. अद्याप FRI दाखल झालेला नाही. VRS कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. ही मागणी देखील मान्य झालेली नाही. अजित दादांचे 41 आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी CBI चौकशीची मागणी केली.
अपघात की घातपात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. काही नेते मॅनेज होवू शकतात, पण स्वाभिमानी जनता नाही. अनेकांचे ऋण माझ्यावर आहेत. यापूर्वीही मी अनेक मुद्दे समोर आणले आहेत. विमानाने का जावे लागले हे कारण मी सांगितले आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे ते रस्ते मार्गे न जाता विमानाने जावे लागले. जास्त प्रमाणात इंधन टॅंकमध्ये टाकले गेले होते.
याप्रकरणी अद्याप एफआयआर झालेला नाही. व्हीएसआर कंपनी बंद करण्याची मागणी केली होती. साडेनऊ महिने झाले आहेत, तरीही काही झालेले नाही. शंकेचे निरसन सत्ताधारी करत नाहीयत. राजकारण केवळ बघायला मिळत आहे. सीआयडीवर कुणाचा दबाव आहे काय़ सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी अजित पवार यांच्या पक्षाने केली होती. तरीही अजून काहीही झालेले नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.