SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दादर स्थानकाच्या ‘चैत्यभूमी’ नामांतराला मनसेकडून का होतोय विरोध? राज ठाकरेंची 15 वर्षांपुर्वीची भूमिकाही चर्चेत!

दादर रेल्वे स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या तयारीला मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचा विरोध. दादरकरांना विचारात घेण्याची मागणी; राज ठाकरेंची 2011 मधील भूमिकाही चर्चेत आहे. याबद्दल जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 19, 2026, 06:38 IST | Updated: Nov 19, 2026, 06:51 IST
Image Credit: नामांतरणाला मनसेचा विरोध (फोटो सौजन्य-गुगल)
Join

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याच्या राज्य सरकारच्या हालचालींना आता मनसेकडून विरोध होताना दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराची प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर दादर विभागातून संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. दादरमधील स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता नामांतराचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रस्तावावर पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दादर नामांतरावरुन काय सुरुय? जाणून घेऊया.

सरकारकडून नामांतराच्या प्रक्रियेला वेग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने या प्रस्तावाला यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून केंद्र सरकारकडे पत्रही पाठवले आहे. केंद्राकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार विधिमंडळ समितीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर नामकरणाची पुढील कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यशवंत किल्लेदारांचा नामांतराला विरोध का?

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. दादरमधील नागरिकांना हे नामांतर मान्य नसल्याचे त्यांनी म्हटलंय. सरकारने स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी स्थानिक रहिवाशांशी चर्चा करावी आणि त्यांची भूमिका जाणून घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. दादरची ओळख आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, असा त्यांच्या भूमिकेचा आशय आहे.

राज ठाकरेंची काय होती भूमिका?

दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा यापूर्वी 2011 मध्येही चर्चेत आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर स्थानकाचे नाव बदलण्यास विरोध केला होता. केवळ नाव बदलल्याने कोणते प्रश्न सुटणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. नाव बदलण्याच्या राजकारणाला आपला विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

चैत्यभूमी नाव देण्याची मागणी नेमकी का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादरमधील ‘राजगृह’ हे निवासस्थान आणि त्यांचे स्मृतिस्थळ असलेली चैत्यभूमी यामुळे या परिसराला आंबेडकरी चळवळीत विशेष महत्त्व आहे. चैत्यभूमीला अभिवादनासाठी देशभरातून अनुयायी येतात. त्यामुळे दादर स्थानकाला चैत्यभूमी नाव द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून आंबेडकरी संघटना आणि अनुयायांकडून केली जात आहे.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुद्दा पुन्हा चर्चेत

दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होतात. यंदाही या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुविधा, सुरक्षा, वाहतूक आणि स्वच्छतेच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. त्याचवेळी स्थानकाच्या नामांतराची घोषणा झाल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला आंबेडकरी अनुयायांची अनेक वर्षांची मागणी, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचा मनसेचा आग्रह, अशा दोन भूमिका आता समोर आल्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES