रोहित पवार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? सतेज पाटील यांचे 2 वाक्यात उत्तर; राजकारणात मोठं काही तरी घडणार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच रोहित पवार काय भूमिका घेणारयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
रोहित पवार : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. निर्णय जाहीर करण्याआधी पक्षाच्या बैठकीत रोहित पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची वेगळी भूमिका घेतली. रोहित पवार यांनी डिलिमिटेशन बिलाला विरोध केला. डिलिमिशन बिलाला पाठिंबा देऊ नका अशी भूमिका रोहित पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पांठिंबा जाहीर करत रोहित पवारांना धक्का दिला आहे. यामुळे आता रोहित पवारांची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच रोहित पवार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दोन वाक्यात उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीने अखेर डिलीमिटेशन बिलाला पाठिंबा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंब्याची घोषणा केली. रोहित पवारांचीही ब्रीच कँडीतली भेट ठरली निष्फळ ठरल्याची देखील चर्चा आहे. डिलीमीटेशन बिलास पाठिंबा दिल्यास पक्षाला नुकसान होईल, असं रोहित पवारांनी शरद पवारांना सांगितले. पण शरद पवार 'त्या' मुद्यावर एक शब्दही बोलले नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आता रोहित पवार काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पक्षात राहूनच रोहित पवार पक्ष भूमिकेला विरोध करणार की जाहिर केल्याप्रमाणे वेगळी वाट निवडणार? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहित पवारांची पक्षात पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे. आधी ट्रँक्टर मोर्चाला विरोध आणि आता डिलीमीटेशन वरुन वेगळी भूमिका.
रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा
रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा आहे. रोहित पवार यांच्या काँगेस प्रवेशाबाबत सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस पक्षाकडून कुठली प्रस्ताव रोहित पवार यांना नाही किंवा त्यांच्याकडून काँग्रेसला नाही असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. 30 नोव्हेंबरनंतर काय घडणार याकडे लक्ष असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचं विलीनीकरणाच्या चर्चेवेळेस देखील रोहित पवार वेगळी भूमिका घेणार असल्याची चर्चा रंगली होती. कोणत्याही परिस्थितीत बाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.