• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /Maharashtra Breaking News LIVE : 03 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Live Now

Maharashtra Breaking News LIVE : 03 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 03 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported ByPrashant JadhavEdited ByPrashant Jadhav
Published: Nov 03, 2026, 06:29 AM IST|Updated: Nov 04, 2026, 03:43 PM IST
joinshare
Maharashtra Breaking News LIVE : 03 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Image Credit: Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 03 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
04 Nov 2026 15:42 IST
share

शाहांनी गोकुळमध्ये लोकशाहीचा गळा घोटला- विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : शाहांनी गोकुळमध्ये लोकशाहीचा गळा घोटला'...बहुमत असूनही संचालकांची हुकूमशाही-वडेट्टीवार...शाहांकडून शेतक-यांच्या मतदानाचा अपमान'..विजय वडेट्टिवारांची अमित शाहांवर टीका

03 Nov 2026 18:19 IST

'अनिकेत तटकरे शिवसेनेच्या बळावर आमदार झाले'- महेंद्र थोरवे

Disputes within Mahayuti Alliance in Raigad : रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद काही थांबायचे नाव घेत नाही आहेत... अनिकेत तटकरे हे शिवसेनेच्या बळावर आमदार झालेत. त्यांचे स्वतःचे काहीच कर्तृत्व नाही... असा टोला महेंद्र थोरवेंनी लगावला... आमदार होण्यासाठी सुनील तटकरे यांनी आमच्याजवळ लाचारी पत्करली होती... मात्र आता आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत.. असा हल्लाबोल थोरवेंनी केलाय.
 

03 Nov 2026 17:42 IST

खुनातील आरोपीसोबत आदित्य ठाकरेंचे फोटो, हे नेमकं गौडबंगाल काय?- मीनाक्षी शिंदे

Minakshi Shinde on Aditya Thackeray : मीनाक्षी शिंदेंनी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंचे फोटो दाखवत सवाल उपस्थित केलेत... खूनातील आरोपीसोबत आदित्य ठाकरेंचा फोटो मीनाक्षी शिंदेंनी दाखवलाय... प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील भावड्यासोबत आदित्य ठाकरेंचा फोटो आहे... हे नेमकं गौडबंगाल काय आहे?, असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी केलाय.

03 Nov 2026 14:24 IST

NCP नेते-अमित शाह भेटीची इनसाईड स्टोरी

राष्ट्रवादी नेते-अमित शाह भेटीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे... राष्ट्रवादी पक्ष एकसंघ ठेवा अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती आहे.. विलिनीकरणाचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याला एनडीए सोबत घेण्याची वेळ आली तर तुमच्याशी चर्चा केल्यांशिवाय आणि विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होणार नाही असंही आश्वासन शाहांनी दिलं आहे.. पार्थ
पवारांचीही तक्रार शाहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे...

03 Nov 2026 13:41 IST

'दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करा',मुंबई हायकोर्टाने BMC ला सुनावलं

Dia Mirza : दिया मिर्झाचा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिलेत... दिया मिर्झाच्या व्हिडीओवरील टीकेवरून मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली.... बीएमसीच्या पर्यावरणपूरक दिवाळी मोहिमेवरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर मुंबई हायकोर्टानं तीव्र आक्षेप घेतला... अभिनेत्री दिया मिर्झाला लक्ष्य केल्याबद्दल आणि सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्यांना जातीय रंग दिल्याबद्दल मुंबई हायकोर्टानं राजकीय नेत्यांना फटकारलंय...

03 Nov 2026 13:14 IST

कल्याण-डोंबिवली, शहाड, अंबरनाथमध्ये 36 तास पाणीपुरवठा बंद

Water Cut : उल्हास नदीमार्गे पाणी जाणा-या सर्व प्राधिकरणांनी एकाच दिवशी 'शटडाउन' घेण्याचा निर्णय घेतलायं... या निर्णयानुसार गुरुवार रात्री १२ ते शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत ३६ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.... दुष्काळी परिस्थितीमुळे धरण आणि नदीतील पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून उल्हास नदीची पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे... धरणातील पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने नियोजन केलंय....बारवी धरणातून कल्याण-डोंबिवली, शहाड, अंबरनाथ, डोंबिवली औद्योगिक विभाग आणि कल्याण ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो.. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर या भागांत आधीच पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता... मात्र वेगवेगळ्या प्राधिकरणांचे पाणीकपातीचे दिवस वेगवेगळे असल्याने, धरणातील पाण्याचे नियोजन बिघडत होते... त्यामुळे आता एकाच दिवशी पाणीकपात करण्यात येणार आहे....

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

03 Nov 2026 12:33 IST

शिवसेना पक्ष-चिन्हावर आज सुनावणी

शिवसेना पक्ष- चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ...दुपारी 2 वाजतानंतर सुनावणी होण्याची शक्यता....सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार...एकनाथ शिंदे यांचे वकील ध्रुव मेहता करणार युक्तिवाद...या अगोदर 29 ऑक्टोबर रोजी वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नव्हती

बातमीचा व्हिडिओ पाहा- 

03 Nov 2026 12:21 IST

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, राजू शेट्टींना पोलिसांची नोटीस

Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे.... या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावलीयं..... कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून वाहतुकीला अडथळा केल्यास, कारवाई केली जाणार असल्याचं नोटिसीमध्ये उल्लेख आहे.... राष्ट्रीय महामार्ग रोखला तर सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होतात..... त्यामुळे या आंदोलनापासून परावृत्त होण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय....

बातमीचा व्हिडिओ पाहा-

03 Nov 2026 11:20 IST

सातारा जिल्हा बँक निवडणूक, फलटणमधून संजीवराजे निंबाळकर विजयी

Satara : सातारा जिल्हा बँक निवडणूक ...फलटणमधून संजीवराजे निंबाळकर विजयी ...समशेरसिंह निंबाळकर यांना पराभवाचा धक्का

03 Nov 2026 11:06 IST

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, तासगावमधून संजयकाका पाटलांचा विजय

Sangli : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक...तासगावमधून संजयकाका पाटलांचा विजय...राष्ट्रवादी SPच्या सुमनताई पाटलांचा पराभव
 

03 Nov 2026 10:35 IST

सांगली जिल्हा बँकेत पडळकरांची एन्ट्री, जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर विजयी

Sangli : सांगली जिल्हा बँकेत पडळकरांची एन्ट्री...जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर विजयी...मविआच्या विनोद पवारांचा 20 मतांनी पराभव ...गोपीचंद पडळकर 54, विनोद पवार 34 मतं

बातमीचा व्हिडिओ पाहा-


 

03 Nov 2026 10:04 IST

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक, पारनेरमधून खासदार निलेश लंके विजयी

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक ...पारनेरमधून खासदार निलेश लंके विजयी ...निलेश लंकेंना 104 पैकी मिळाली 63 मतं

बातमीचा व्हिडिओ पाहा-

03 Nov 2026 09:35 IST

सातारा जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती, पालकमंत्री शंभूराज देसाईंची बाजी

Satara : सातारा जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती...साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची बाजी...भाजपच्या सत्यजित पाटणकरांचा पराभव

बातमीचा व्हिडिओ पाहा-


03 Nov 2026 09:05 IST

सांगली जिल्हा बँक, 6 जागांचा आज फैसला

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बँकेच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी होणार असून, यामध्ये सर्वाधिक लक्ष जत सोसायटी गटाच्या निकालाकडे लागलंय.... या गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांच्यात चुरशीची लढत झाली आहे...जत सोसायटी गटात अवघे 87 मतदार असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विजयासाठी 45 मतांचा आकडा गाठणे आवश्यक असल्याने दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. तर सातारा, अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचाही आज फैसला होणार आहे, अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये लंके विरुद्ध विखे समर्थकांमध्ये सामना रंगला होता.. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय. तर साता-यातही जिल्हा बँकेचा निकाल लागणार आहे.. 
 

03 Nov 2026 08:37 IST

सिंधुदुर्गात ओंकार हत्तीवर रॉकेट हल्ला

सिंधुदुर्गातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात ओंकार हत्ती राजरोस वाडी वस्त्यांमध्ये फिरत असून त्याच्याकडून शेतीचे नुकसान होत आहे. ओंकार हत्तीला लांब घालविण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ओंकार हत्तीवर पेटत्या मशाली फेकल्याचा वीडियो व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेचा नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. मात्र, असाच वीडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये ओंकार हत्तीवर रॉकेटद्वारे हल्ला केल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.

03 Nov 2026 08:02 IST

एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन

एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.... एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली.... ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येणार आहे.... मागण्यांची पूर्तता न झाल्यास ५ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे..... आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये घंटानाद करून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.... तर उद्या सर्व आगारांमध्ये द्वारसभा आणि निदर्शने होणारेय.... त्यानंतर ५ नोव्हेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.... दरम्यान, आज दुपारी १ वाजता मुंबई सेंट्रल येथील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर घंटानाद, निदर्शने आणि द्वारसभेचे आयोजन करण्यात आलंय..

03 Nov 2026 07:29 IST

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना केंद्र सरकारचा दिलासा

केंद्र सरकारने NDRF अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीच्या निकषांमध्ये बदल केले आहेत... नव्या निकषांनुसार खरीप, जिरायती शेती, बागायती शेती, फळबागा, पशुधन, कुक्कुटपालन तसेच घरांच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली आहे...अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत अधिक मदत मिळणार आहे... दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना या वाढीव निकषांचा दिलासा मिळणार का, असा प्रश्न आहे.

बातमीचा व्हिडिओ पाहा-

03 Nov 2026 07:00 IST

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी महिलेला अटक

Tiger Shroff Firing Case : अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे... हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक केली आहे... हरियाणा पोलिसांच्या मदतीनं 1 नोव्हेंबरला अटकेची कारवाई केली आहे.... या अटकेमुळे प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 13 वर गेली आहे...

बातमीचा व्हिडिओ पाहा-

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Indian Politics
Breaking News

About the Author

Prashant Jadhav

Prashant Jadhav

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
ठाकरेंचे दिवाळी सेलिब्रेशन! बहीण जयजयवंती ठाकरेंच्या घरी भाऊबीज

ठाकरेंचे दिवाळी सेलिब्रेशन! बहीण जयजयवंती ठाकरेंच्या घरी भाऊबीज

2

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगात खळबळ! व्हायरसने शास्त्रज्ञांची झोप उडवली; WHOकडून अलर्ट जारी

3

जगातील सर्वात मोठी चीप कंपनी भारतातील 1000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार; कंपनीचे नाव जाणून शॉक व्हाल

4

घरच्या घरी बनवा पारंपरिक गुळाची खीर; जाणून घ्या सोपी रेसिपी

5

Kwala Intel वापरल्यावर CA Mukesh Jain झाले आश्चर्यचकित, 'हे इतर AI टूल्स सारखे नसून जबरदस्त अन् अचूक'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 03 नोव्हेंबर 2026  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.