SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

चित्रपटालाही लाजवेल असे हत्याकांड, चंद्रपुरात शिक्षकाने प्रेयसीला संपवले, नंतर रिकाम्या घरात नेऊन...

प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका शिक्षकाने प्रेयसीचा चंद्रपूर येथे खून केला.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 19, 2026, 12:42 PM IST | Updated: Oct 19, 2026, 12:45 PM IST
Image Credit: chandrpur crime news
Join

चंद्रपुरातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. शिक्षकानेच त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका शिक्षकाने प्रेयसीचा चंद्रपूर येथे खून केला. धक्कादायक म्हणजे, शिक्षकाने चंद्रपूरात प्रेयसीची हत्या केली आणि नागपुरात मृतदेह पुरला. चित्रपटालाही लाजवेल अशी घटना घडल्याने पोलिसही हादरले आहेत.

चंद्रपूर येथील शिक्षक संतोष साखरकर असे प्रेमसंबंधातून प्रेयसीचा गळा आवळून खून करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. संतोषने वैशाली टिपले हीचा 14 ऑक्टोबरला चंद्रपूर येथे खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह घेऊन संतोषने नागपुरातील हिंगणा भागातले आपले घर गाठले.

भयानक म्हणजे, घरातच एक खड्डा खणून संतोषने प्रेयसी वैशालीचा मृतदेह घरात पुरला होता. अखेर चंद्रपूर पोलिसांनी हिंगणा पोलिसांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढल्याने परिसरात खळबळ उडाली

14 ऑक्टोबरला दोघांमध्ये भांडण झाले. संतोषने वैशालीवर जड वस्तूने प्रहार करत नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून दुसऱ्या दिवशी त्याने हिंगणा भागातील आधार नगरी येथील घर गाठले. संतोषने काही वर्षांपूर्वी हिंगणा येथील आधारनगरी परिसरात एक घर खरेदी केले होते. सध्या हे घर रिकामे होते. याच संधीचा फायदा घेत त्याने 15 ऑक्टोबर रोजी कारच्या डिक्कीतून मृतदेह घरात आणला. घराच्या मागील बाजूला असलेल्या खोलीत खड्डा खोदून त्याने मृतदेह पुरला. त्यानंतर खड्ड्यावर फरशी बसवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य केल्यानंतर तो पुन्हा चंद्रपूरला परतला.

वैशाली बेपत्ता झाल्याची तक्रार चंद्रपूर पोलिसांत दाखल झाली होती.

दरम्यान, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने वैशालीचा मोबाईल फोन प्रवासादरम्यान रेल्वेच्या एका बोगद्यात फेकून दिला. दुसरीकडे वैशाली बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान तिचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. त्यावरील संपर्कांचा तपशिल तपासत असताना पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली देत मृतदेह हिंगणा येथील घरात पुरल्याचे सांगितले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES