SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या पक्षात 2 गट! कार्यकर्तेही सोडू लागले साथ, हे पाहा उदाहरण; विदर्भात तर वेगळाच धोका

मी माझी आजपर्यंतची राजकीय वाटचाल केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहून केली. अगदी अजित पवारांनी पक्ष फोडला तरीही मी नेहमीच शरद पवार साहेबांसोबतच राहिलो, पण आता...

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 29, 2026, 11:10 IST | Updated: Nov 29, 2026, 11:13 IST
Image Credit: delimitation bill sharad pawar
Join

डिलिमिटेशनविरोधात काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरु असताना शरद पवारांच्या पक्षात 2 गट पडले आहेत.  डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं पक्षातील अनेकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पक्षातून पहिला राजीनामा आला तर दुसरीकडे सोशल मीडियावरून कार्यकर्ते शरद पवारांची साथ सोडत आहेत. सोशल मीडियावर कार्यकर्ते असो किंवा मतदाते नाराजी व्यक्त करताना पाहिला मिळत आहे. अशातच शरद पवार यांच्यासोबत असलेला एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत विश्वास तोडल्याचा उल्लेख करत त्यांची साथ सोडली आहे. लक्ष्मण मारोतराव ईक्कर पाटील असं या कार्यकर्त्याचे नाव आहे.

त्याने सोशल मीडियावर लिहिलंय की, मी माझी आजपर्यंतची राजकीय वाटचाल केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहून केली. अगदी अजित पवारांनी पक्ष फोडला तरीही मी नेहमीच शरद पवार साहेबांसोबतच राहिलो, ते देखील कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा दृष्टीक्षेपात नसताना आणि त्याचा मला अभिमानही वाटत होता.

पुढे तो लिहतोय की, कारण शरद पवार साहेब हे छत्रपती शाहू, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना कधीच तिलांजली देणार नाहीत असा विश्वास होता, तोच आज धुळीस मिळाला आणि त्यासोबतच त्यांच्याबद्दलचा आदर देखील.

त्याने खासदारांना सोशल मीडियावरून ट्विट करत खासदारांना विनंतीही केली आहे. महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला मतदान केले आहे... डिलीमीटेशन बिलाला समर्थन देऊ नका..मतदानाच्या दिवशी गैरहजर ही राहू नका. या विधेयकाच्या विरोधात मतदान करा.

 

 


प्रत्येकवेळी विदर्भाच्या वाट्याला अन्यायच का?

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून आता विदर्भाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्येक परिसीमनात विदर्भाच्या वाट्याला अन्यायच का, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे

2008 मध्ये झालेल्या परिसीमनात विदर्भाच्या विधानसभा मतदारसंघांची संख्या 66 वरून 62 वर आली, तर लोकसभेचा एक मतदारसंघही कमी झाला. आता 2026 च्या प्रस्तावित परिसीमनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विदर्भाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा येण्याची भीती प्रसेनजीत पाटील यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून प्रस्तावित परिसीमन विधेयकाला विरोध करण्याची मागणी केली आहे. दीडपट वाढीच्या निकषानुसार विदर्भाला 93 विधानसभा आणि 15 लोकसभा मतदारसंघ मिळाले पाहिजेत, अशी त्यांची ठाम मागणी आहे. लोकसंख्या वाढीचा निकष लावताना विदर्भाचे क्षेत्रफळ, आदिवासीबहुल भाग, शेतकरी आणि मागासलेपणाचा विचार का केला जात नाही? विदर्भाच्या राजकीय प्रतिनिधित्वावरच वारंवार अन्याय का होतोय? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES