SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नागपूर हादरलं! दारूच्या नशेत बाप करायचा घाणेरडं कृत्य, म्हणून मुलीने बॅटने...

दारूच्या नशेत वडील मुलीचा छळ करायचा तिच्यावर वाईट नजर ठेवायचा म्हणून मुलीने बापावर लाकडी बॅटने हल्ला केला.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 09, 2026, 01:30 PM IST | Updated: Oct 09, 2026, 01:32 PM IST
Image Credit: Nagpur Crime
Join

नागपूरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत वडील मुलीचा छळ करत तिच्यावर अतिप्रसंग करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 45 वर्षीय पित्याने आपल्या 17 वर्षीय मुलीसोबत घाणेरडं कृत्य करत होता म्हणून मुलीने आपल्या बचावासाठी वडिलांवर लाकडी बॅटने हल्ला केला. या हल्ल्यामुळे वडील गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत मुलीवर वडील सतत जवळीक साधायचे, शिवीगाळ करायचे एवढंच नाहीतर मारहाण करायचे असा आरोप मुलीने केला आहे. मृत व्यक्तीचे नाव जयपाल खोलपिटणे असं आहे. खोलपिटणे कुटुंबात पत्नी, 17 वर्षांची मुलगी, एक लहान मुलगा आहे. पत्नी घरकामासाठी गेल्यावर वडील मुलीसोबत असभ्य कृत्य करत होते, असं मुलीने सांगितलं.  17 वर्षांची मुलगी ही बारावीमध्ये शिकते. कुटुंबाने सांगितलं की, खोलपिटणे हे दारू पिऊन आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियासोबत वाद व्हायचा. ते मुलीला शिवीगाळ करायचे. तिला मारहाण करायचे. एवढंच नाहीतर तिच्यावर त्यांची वाईट नजर होती. गेल्या दोन वर्षांपासून वडिलांकडून हा मानसिक त्रास होत असल्याचा मुलीने पोलिसांना सांगितलं.

घटनेच्या दिवशीही जयपाल हा दारूच्या नशेत होता. त्यावेळी घरात मुलगी आणि लहान मुलगा होता. नशेत असताना त्याने मुलीशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न  केला. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि मुलीने लाकडीच्या बॅटने वडिलांच्या डोक्यावर वार केला. यात जयपाल गंभीर जखमी झाला. यानंतर आई घरी आल्यावर तिने झालेला प्रकार सांगितला. मग जखमी अवस्थेत जयपालला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान जयपालचा मृत्यू झाला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES