SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शरीरसंबंधांची मागणी अन्...; प्रियकरासोबत जंगलात गेलेल्या तरुणीसोबत नको ते घडलं, नागपुरातील धक्कादायक घटना

नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील निर्जन जंगलात मित्रासोबत बसलेल्या तरुणीला लक्ष्य करत अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 26, 2026, 14:48 IST | Updated: Nov 26, 2026, 14:51 IST
Image Credit: nagpur crime news 19 years old girl assaulted by young man in aamrai jungle
Join

नागपूरमध्ये एक भीषण घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत फिरायला आलेल्या तरुणीवर एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रियकराला मारहाण करत तरुणीवर अत्याचार केल्याचे समोर येत  आहे.या प्रकरणी युवतीच्या कुटुंबीयांनी सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील निर्जन जंगलात 19 वर्षीय तरुणी प्रियकरासोबत फिरायला आली होती. आरोपीने तिच्या प्रियकराला बेदम मारहाण करुन तिथून पळवून लावले. त्यानंतर एकट्या पडलेल्या तरुणीवर आरोपीने जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. तरुणीने प्रतिका करुनही आरोपीने तिच्यावर बळजबरी केली.

तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तरुणी आपल्या मित्रासोबत बसली असताना त्याठिकाणी एक युवक आला. त्याने युवतीच्या मित्राला मारहाण करत पळवून लावले. त्यानंतर तरुणीला धमकी देत शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र तरुणीने नकार दिला असता तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकंच नव्हे तर घटनेचा व्हिडिओदेखील चित्रित केला आहे.

आरोपीने तरुणीकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेतला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत घटनास्थळावरुन पळ काढला. सोमवारी 23 नोव्हेंबरला दुपारी ही घटना घडली. मात्र घाबरल्यामुळं तरुणीने  24 नोव्हेंबरला संध्याकाळी तक्रार दिल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी युवतीच्या कुटुंबीयांनी सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आमराई परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्याची प्रक्रिय सुरू आहे. मात्र अजून पर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती आला नाही.

या घटनेनंतर अमराई जंगल परिसरातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. निर्जन भाग असल्यामुळं स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. परिसरात बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र त्यानंतरही आवश्यक बंदोबस्त आणि सुरक्षा नसल्याने अशा प्रकार घडल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES