SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नागपुरात हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, पॉश एरियामध्ये पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर शहरातील पॉश एरियामध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईनंतर शहरात खळबळ माजली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 25, 2026, 10:43 PM IST | Updated: Oct 25, 2026, 10:47 PM IST
Image Credit: nagpur Crime News
Join

नागपूर शहरातील अचरज टॉवरमधील ग्रेप्स स्पा अँड सलूनवर पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी हायप्रोफाईल देहव्यापाराचं मोठं रॅकेट समोर आलं आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने स्पावर ही धाड टाकली आहे. पोलिसांना ग्रेप्स स्पा अँड सलूनमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी इथे छापेमारी केली असताना मोठं रॅकेट उघडकीस आलंय. या ठिकाणी पोलिसांनी वेश्या व्यवसायात करणाऱ्या तीन पीडित तरुणींची सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन तरुणींपैकी एक तरुणी गोंदिया जिल्ह्यातील आहे, तर दोन तरुणी या नागपूरमधील आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी हार्दिक नितीनला अटक केली आहे. तर स्पाची मुख्य संचालिका गुंजन आसरे आणि व्यवस्थापक अन्नू जहीर फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.

नागपुरात 1.40 कोटींचे एमडी जप्त, पाच जण ताब्यात


नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने कारवाई करत 1 कोटी 40 लाख 50 हजार रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केली. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण 1 कोटी 54 लाख 50 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारत पेट्रोल पंपाजवळील रिंग रोडवरील नरेंद्रनगर परिसरातील विजया अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 1,405 ग्रॅम एमडी पावडर, सहा मोबाइल, एक व्हर्ना कार, चार दुचाकी, इलेक्ट्रिक वजनकाटा, बॅग आणि 3 लाख 44 हजार 700 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

महिलेला खोटी तक्रार देण्यासाठी पाच लाखांचे आमिष ; आग्रा येथील आरोपीला अटक

राजस्थानातील एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात गोवून त्याच्याकडून तीन कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. यासाठी एका महिलेला खोटी तक्रार दाखल करण्यास प्रवृत्त करून तिला पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आदित्य सुरेशचंद्र गुप्ता याला तहसील पोलिसांनी अटक केली आहे.

यात तरुणीने 13 ऑक्टोबर रोजी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. एका अॅपच्या माध्यमातुन  राजस्थानातील इरफान नावाच्या व्यक्तीशी तिची ओळख झाल्याचे तिने तक्रारीत नमूद केले होते. इरफान आणि त्याच्या साथीदारांनी नोकरीचे आमिष दाखवून  मुलीचे वैयक्तिक विडिओ व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला होता.

या तक्रारीनंतर पोलिसांनी राजस्थानातील इरफान अली याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी त्यांना अटक करण्यात आली.

प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी कथित अश्लील व्हिडिओसंदर्भातील पुरावे मिळविण्यासाठी मिनलचा मोबाइल मागितला. तसेच, तिच्याकडे काही प्रश्नांची विचारणा केली. मात्र तिच्यासोबत आलेला आदित्य गुप्ता स्वतःच पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागला. तरुणीला प्रश्न विचारण्याऐवजी मीच तुम्हाला तयार तक्रार देतो. त्यानुसार तपास करा असे त्याने पोलिसांना सांगितले.

याशिवाय, राजकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्तींशी आपले संबंध असल्याचे सांगून त्याने तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या संशयास्पद वर्तनामुळे पोलिसांनी प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

चौकशीत खोट्या तक्रारीचे बिंग फुटले

यानंतर तहसील पोलिस ठाण्याचे पथकाने मिनलची सविस्तर चौकशी केली. यावेळी तिने इरफानला ओळखत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, त्याच्याशी सोशल मीडियावर कधीही संवाद झाला नसल्याचेही तिने सांगितले.

आदित्य गुप्ताच्या सांगण्यावरून आपण खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली तिने चौकशीत दिली. ही तक्रार देण्यासाठी आदित्यने पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविल्याची माहितीही तिने पोलिसांना दिली. या खुलाशानंतर पोलिसांनी आदित्य गुप्ताला अटक केली.

आदित्य गुप्ता याने यापूर्वीही पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने खोटा गुन्हा दाखल करून तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात त्याला काही रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच पद्धतीने नागपुरातही खोटा गुन्हा दाखल करून पैसे उकळण्याचा त्याचा डाव होता. मात्र, तहसील पोलिसांनी हा कट उधळून लावला.

दरम्यान, आदित्य गुप्तावर आग्रा येथे चोरी केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी यापूर्वी केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच, आदित्य गेल्या पाच वर्षांपासून घर सोडून गेला असून, त्याच्याशी संपर्क नसल्याचेही त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES