SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

क्राईम पेट्रोल पेक्षा डेंजर स्टोरी! पित्यानेच केली लग्न झालेल्या लेकीची हत्या; कारण जाणून पोलिसांनाच बसला धक्का

वाशिममध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पित्यानेच आपल्या विवाहीत मुलीची हत्या केली आहे. हत्येमागचे कारणा जाणून पोलिसहही शॉक झाले आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 26, 2026, 05:56 PM IST | Updated: Oct 26, 2026, 05:57 PM IST
Join

वाशिम क्राईम न्यूज : ज्या बापाने लेकीला लहानाचं मोठं केलं,तिच्या सुखी संसाराची स्वप्नं पाहिली,त्याच बापाने रागाच्या भरात तिचा गळा आवळून जीव घेतल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा येथे समोर आली आहे. कोणताच पुरावा नसताना पोलिसांनी या पित्याला अटक केली. पोलिस तपासात हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे. 

पित्याने लेकीची हत्या केल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे, तर दुसऱ्याच दिवशी मुलीवर अंत्यसंस्कार करून अस्थींचे विसर्जनही करण्यात आले. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे या घटनेचा उलगडा झाला.चौकशीदरम्यान पित्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्राह्मणवाडा गावात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष गोटे यांची 35 वर्षीय विवाहित मुलगी दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंधात असल्याच्या कारणावरून घरात वाद होत होते. वारंवार समजावूनही ती ऐकत नसल्याच्या रागातून संतोष गोटे यांनी तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करून काटेपूर्णा नदीत अस्थी विसर्जनही करण्यात आले.

मात्र,पोलिसांना या घटनेबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर संशयाच्या आधारे संतोष गोटे यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार,चौकशी दरम्यान त्यांनी हत्येची कबुली दिली. आता मृत महिलेच्या आईकडून तक्रार घेण्याची प्रक्रिया सुरू असून,फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने शिरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत. 

पित्याने 9 महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरुन खाली फेकले

घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर 25 ऑक्टोबर रोजी रात्री पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या नऊ महिन्यांच्या बाळाला खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक केली आहे अधिक तपास पोलिस करत आहे.

आई-वडिलांनी आणि सख्या भावानेच केली हत्या

सातारा- सांगली जिल्हा हद्दीवर असलेल्या सोनसळ घाटात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या कारणावरून  आई-वडिलांनी आणि सख्या भावाने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 15 ऑक्टोबर रोजी घरातच त्याची हत्या करून मृतदेह सोनसळ घाटात टाकण्यात आला होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES