SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Exclusive: कर्जतनंतर आणखी एका मोठ्या जंगलतोडीचा घाट? यवतमाळमध्ये 50 हजार झाडांच्या कत्तलीचा गुपचूप डाव?

यवतमाळमधील रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी जवळजवळ 50 हजार अतिरिक्त झाडांची कत्तल करण्याचा धक्कादायक प्रस्ताव पुढे आला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 26, 2026, 18:46 IST | Updated: Nov 26, 2026, 19:17 IST
Image Credit: रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी तब्बल 50 हजार अतिरिक्त झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा घाट?
Join

कर्जतमध्ये टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या जखमा अजून ताज्या असतानाच, आता विदर्भात आणखी एका मोठ्या जंगलतोडीचा घाट घातला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यवतमाळमधील रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी जवळजवळ 50 हजार अतिरिक्त झाडांची कत्तल करण्याचा धक्कादायक प्रस्ताव पुढे आला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करणारा, उद्याच्या बैठकीचा अजेंडा थेट 'झी २४ तास'च्या हाती लागला आहे!

उद्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, याच बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत हा प्रस्ताव 9व्या क्रमावर चर्चेला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बड्या प्रकल्पांसाठी पुन्हा एकदा हजारो झाडांचा बळी दिला जाणार का? कोणाच्या आशीर्वादाने हा पर्यावरणाचा सौदा मांडला जातोय? असे खळबळजनक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी आधीच 467.5 हेक्टर राखीव वनजमीन बहाल करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरडवाड, हिरापूर आणि गोविंदपूर या तीन गावांतील जमिनीचा समावेश आहे. इतकंच नव्हे, तर ही वादग्रस्त जमीन टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आहे.

आतापर्यंत नेमकं काय घडलं?

- तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यकाळात 2009मध्ये रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पाला चालना

-  वनसंवर्धन कायदा 1980 अंतर्गत 'सी क्लास' राखीव वनजमीन वळवण्याचा अधिकृत प्रस्ताव मे 2011मध्ये सादर

- महाराष्ट्र सरकारकडून एप्रिल 2012 मध्ये प्रस्तावाला मंजुरी

- केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून डिसेंबर 2012 मध्ये तत्त्वतः मंजुरी

- यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात सिमेंट प्रकल्प उभारण्यासाठी 467.5 हेक्टर राखीव वनजमीन वळवण्यास 2018मध्ये मंजुरी

- यवतमाळच्या झरी जामणीमधील पिंपरडवाड, हिरापूर आणि गोविंदपूर या तीन गावांमधील वनजमिनीचा या प्रकल्पासाठी समावेश

- हा परिसर मुकुटबनजवळ, या भागात वाघांच्या प्रजननाची नोंद झाल्याची माहिती

- संबंधित वनक्षेत्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर

-  या वृक्षतोडीला मंजुरी दिल्यास पर्यावरणप्रेमींचा संताप

आधी आरेमधील वृक्षतोड, त्यानंतर कर्जतच्या भीमाशंकर अभयारण्यातील झाडांची कत्तल... आणि आता थेट यवतमाळमध्ये 50 हजार अतिरिक्त झाडांच्या कत्तलीचा हा प्रस्ताव! एकामागून एक जंगलांचा घास घेण्याचं हे सत्र नेमकं कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे? या धक्कादायक प्रकारामुळे आता संपूर्ण राज्यभर संतापाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES