SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

137 कोटींचा रस्ता, नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय, कुंभमेळ्याआधी मेगा प्रोजेक्ट

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहेत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 27, 2026, 11:09 AM IST | Updated: Oct 27, 2026, 11:10 AM IST
Image Credit: Parallel Road Project To Ease Traffic Before Kumbh Mela 2027
Join

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट येथे ध्वजारोहण होणार आहे. 2027मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अनेक पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात आले आहेत. अनेक प्रकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तर काहीचे काम सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कुंभमेळ्यासाठी द्वारका सर्कल ते उपनगर नाका मार्गे दत्त मंदिर चौकापर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60चे रुंदीकरण होणार आहे. त्यासाठी 137.54 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आी आहे. 5.65 किलोमीटर लांबीचा रस्ता 47 मीटर रुंद करून आठपदरी करण्यात येणार आहे.

रस्त्याच्या मध्यभागी सहापदरी मुख्य रस्ता, तर दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन पदरी सेवा रस्ते उभारले जाणार आहेत. केंद्र सरकारने 221.52 कोटी रुपयांच्या निधीसह प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मंजूर रकमेपेक्षा सुमारे 84 कोटी रुपये कमी दराने काम होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांसाठी 15 दिवसांत आराखडा सादर करण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.

द्वारका सर्कल ते उपनगर नाका मार्गे दत्त मंदिर चौकापर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे रुंदीकरण करण्यासाठी तांत्रिक तपासणी आणि मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तसंच, मार्च 2027 पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

सव्वा दोन कोटी भाविक येणार

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळाच्या शाही स्नानाच्या दिवशी तब्बल सव्वा दोन कोटी भाविक स्नान करतील. तर कुंभमेळ्याच्या इतर दिवशी रोज किमान दहा लाख भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये असतील, असा अंदाज नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ने व्यक्त केला आहे. नागपूर आयआयएम ला सिंहस्थ कुंभमेळा साठी लोकांची गर्दी आणि वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार म्हणून निवडण्यात आले आहे.

ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या 31 ऑक्टोबरच्या  ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी - पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES