• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /नाशिकमध्ये खळबळ! रिटायर होण्याच्या 24 तास आधी मालेगाव महापालिका आयुक्ताला अटक

नाशिकमध्ये खळबळ! रिटायर होण्याच्या 24 तास आधी मालेगाव महापालिका आयुक्ताला अटक

नाशिकमध्ये खळबळजनक घडामोड घडली आहे. मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना ACB ने अटक केली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 29, 2026, 03:04 PM IST|Updated: Oct 29, 2026, 03:29 PM IST
joinshare
नाशिकमध्ये खळबळ! रिटायर होण्याच्या 24 तास आधी मालेगाव महापालिका आयुक्ताला अटक

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

2

मोठी बातमी! शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरण भोवलं, पत्रात म्हणाल्या ‘माझ्यामुळे...’

3

दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

4

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! तीन विश्वासातल्या माणसांनी साथ सोडली, मलिंगा सहित....

5

महाराष्ट्रात आणखी एक वंदे भारत; प्रवासाचा वेळ 7 तासांनी कमी होणार, 9 स्थानके अन्, तिकीट किती? पाहा संपूर्ण वेळापत्रक

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिक : नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरु असतानाच खळबळजनक वृत्त समोर आले आहे. मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. कंत्राटदाराचे बिल काढण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप केला जात आहे. 

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे.  मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांना सुरुवातीला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात होते. मात्र, नंतर त्यांना अटक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव  यांच्यासह  उद्यान अधीक्षक नीलेश पाटील यांनाही ACB कडून ताब्यात घेतले आहे. 

रवींद्र जाधव यांनी कंत्राटदाराचे बिल काढण्यासाठी 4 टक्के लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. दोन वेगवेगळ्या कामांचे 20 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी रवींद्र जाधव यांनी लाच  मागितल्याचा आरोप केला जात आहे. 

लाचेची रक्कम मागितल्याप्रकरणी तक्रारदाराने ACB कडे तक्रार  दिली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केली.  आयुक्त रवींद्र जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर ACB चे पथक नाशिक कार्यालयात दाखल झाले. त्यांची चौकशी सुरु आहे. 

विशेष म्हणजे रवींद्र जाधव हे उद्या रिटायर होणार होते. त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यामुळे त्यांचं निवृत्तीवेतन आणि इतर सुविधा अडचणीत सापडणार आहेत. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचत मालेगावात धाड मारली. मूळ तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी केलेल्या 2 कामांचे बिल पास करण्यासाठी रविंद्र जाधव, आयुक्त, महानगरपालिका मालेगाव जि. नाशिक व त्यांचे स्वीय सहायक निलेश पाटील, अकाउंट हरीश डिंबर यांनी प्रत्येकी 4  टक्के प्रमाणे 80,000  हजार रूपये लाचेची मागणी केली आहे. म्हणून त्यांचे वर मालेगाव किल्ला पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर या आधीही ACB ची कारवाई झाली आहे

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
crime