SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

लग्नाच्या मांडवातच नवऱ्यामुलासह त्याच्या नातेवाईकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; कारण समजल्यावर पोलिसही हादरले

लग्नाच्या मांडवात नवरदेवाला जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. येवला शहरात धक्कादायक घटना घडली. प्रेम विवाहाच्या रागातून मुलीच्या कुटुंबाने हल्ला केला. हाणामारीमध्ये 7 ते 8 जण जखमी झाले आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 25, 2026, 06:25 PM IST | Updated: Oct 25, 2026, 06:29 PM IST
Join

नाशिक क्राईम : लग्नाच्या मांडवातच नवऱ्यामुलासह त्याच्या नातेवाईकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेम विवाहाच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी हा हल्ला केला. येवला शहरातील एका लॉन्समध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

येवल्यातील तरुणाचं निफाड तालुक्यातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी पळून जाऊन नोंदणीकृत लग्न केलं. त्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी दोघांचा रितसर विवाह सोहळा आयोजित केला. मात्र, प्रेम विवाहाचा राग मनात धरत मुलीच्या नातेवाईकांनी लग्न सोहळ्यात डिझेलचे कॅन ओतून नवरदेव आणि त्याच्या नातेवाकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यात सात ते आठ जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून दोन्ही बाजूनं गुन्हा नोंदवला आहे. 

नेमकं काय घडलं?

येवला शहरातील ऋषभ दीपक भगुंडे तरुणाचे निफाड तालुक्यातील रामपूर नैताळे येथील एका तरुणी सोबत प्रेम संबंध होते या दोघांनी पळून जाऊन सप्टेंबर महिन्यात हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणीकृत विवाह केला होता दरम्यान आज येवला शहरातील एका लॉन्स मध्ये नवरदेवाकडील नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केला होता.

हा विवाह सोहळा सुरू असताना मुलीच्या नातेवाईकांनी प्रेम विवाहाचा राग मनात ठेवून लग्न सोहळ्यात डिझेलचे कॅन सोबत घेऊन नवरदेव व त्याच्या नातेवाईकांच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करून त्यांना मारहाण केली यावेळी नवरदेवच्या नातेवाईकांनी देखील प्रतिकार केल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने हा सर्व प्रकार उपस्थितांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे
दरम्यान या घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना मिळतात त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून दोन्ही बाजूने गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पिकअप वाहनात चोरीछुपे पद्धतीने मृतदेह घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला अटक

नाशिकच्या येवल्यात संभाजीनगर महामार्गावर गंगा दरवाजा परिसरामध्ये एका छोटा हत्ती पीकअप वाहनांमध्ये मयत झालेल्या इसमाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  संशयितरित्या या वाहनातून मृतदेह लपवून नेला जात होता. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे पाठवला असून मृत पावलेली व्यक्ती नेमकी नैसर्गिक मृत्यू पावली आहे की काही घातपात झाला आहे या संदर्भात पोलिस आता शोध घेत आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES