SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बसची वाट पहात असताना बोरं तोडून खाल्ली, संतापलेल्या वृद्धाने चिमुरडीच्या कानशिलात लगावली अन्...; मालेगावातील संतापजनक घटना

विद्यार्थिनीला भर रस्त्यात मारहाण, बसची वाट पहात असताना बोर तोडून खाण्याच्या कारणावरून केली जबर मारहाण

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 28, 2026, 17:00 IST | Updated: Nov 28, 2026, 17:04 IST
Image Credit: nashik news Girl Beaten Over Berries in Malegaon video viral
Join

मालेगाव नामपूर रोडवरील कृषी महाविद्यालय काष्टी जवळ एक संतापजनक घटना घडली होती. प्राथमिक माहिती नुसार दोन लहान बालिका घरी जाण्यासाठी गाडीची वाट बघत असताना जवळच असणाऱ्या झाडावरची बोर तोडून त्यांनी खाल्ली. मात्र त्याच ठिकाणी असलेल्या संशयित वसंत हिरे यांनी येऊन एका बालिकेला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर संशयित वसंत हिरे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच, या मुलीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलींनी झाडावरची बोरं तोडून खाल्ल्याने संशयित वसंत हिरे याने एका मुलीच्या कानाखाली मारली. तेव्हा ती विद्यार्थिनी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन पडली. स्थानिक नागरिकांनी जेव्हा हिरे याला विरोध केला तेव्हा त्याने त्यांच्यावरही अरेरावीची भाषा केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नागरिकांशीही हुज्जत घालत 'काय करायचे ते करून घ्या' अशी अरेरावीची भाषा वापरल्याचे समोर आले आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित वसंत दगा हिरे (वय 65)  राहणार काष्टी याच्यावर 115/2 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून वडनेर खाकुर्डी पोलिसांनी सदर संशयितास ताब्यात घेतले असून त्याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी मुलीचा शोध सुरू असून मुलगी अल्पवयीन आहे का ? अल्पसंख्यांक आहे का ? अशा विविध प्रश्नांची चर्चा सुरू झाली असून या घटनेबाबत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES