SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

नाशिककरांसाठी महत्त्वाची आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी दोन दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 28, 2026, 10:44 AM IST | Updated: Oct 28, 2026, 10:46 AM IST
Image Credit: _Nashik trimbakeshwar traffic
Join

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. गेल्या वर्षाभरापासून या सोहळ्याची लगबग सुरू आहे. तब्बल दोन वर्ष हा भक्तीचा सोहळा रंगणार आहे. मुख्य धार्मिक आयोजन आणि अमृत स्नान 2027 मध्ये असणार आहे. त्यापूर्वी या सोहळ्याचा श्रीगणेशा ध्वजारोहण सोहळ्याने होणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट इथे हा सोहळा 31 ऑक्टोबरला असणार आहे. या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहे. या सोहळ्यासाठी भक्तांचीही मोठी मांदियाळी पाहिला मिळेल. त्यामुळे 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.

त्र्यंबकेश्वरमधील वाहतूक मार्गात मोठे बदल

महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 30 ऑक्टोबर सकाळी 8 ते 31 ऑक्टोबर रात्री 8 वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू असणार आहे.  त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. नाशिककरांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी 30 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे.

तर नियमित 30 किलोमीटरचा मार्ग बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गाचे अंतर 55 किलोमीटर असणार आहे. 
पर्यायी मार्ग : अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर

नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाशिक-पिंपळगाव बहुला-संदीप फाउंडेशन-खंबाळे-पेगलवाडी फाटा-त्र्यंबकेश्वर या नियमित मार्गाऐवजी वाहनचालकांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा. पर्यायी मार्ग : अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर.

त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येण्यासाठी पर्यायी मार्ग त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या वाहनांसाठी जव्हार-मोखाडा-अंबोली-त्र्यंबकेश्वर-पेगलवाडी-खंबाळे-संदीप फाउंडेशन-नाशिक या मार्गाऐवजी पुढील मार्ग निश्चित करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग : जव्हार – मोखाडा – अंबोली टी पॉइंट – वाघेरा फाटा – कोने – साप्ते – देवरगाव – गिरणारे – गोवर्धन – नाशिक.

मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी मार्गात बदल मुंबईच्या बाजूकडून वैतरणा फाटा-पहिने-त्र्यंबकेश्वर या मार्गाने येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. पर्यायी मार्ग : वैतरणा फाटा – नाशिक – अमृत गार्डन – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – त्र्यंबकेश्वर.

पहिने-पेगलवाडी मार्गावरील वाहतुकीसाठीही पर्यायी व्यवस्था पहिने-पेगलवाडी-नाशिक या मार्गावरील वाहतुकीसाठी पुढील पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. 
पर्यायी मार्ग : पहिने – आहुर्ली – सांजेगाव – वाडीवऱ्हे – नाशिक. तर पहिने-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर या मार्गावरील वाहतुकीसाठी पुढील मार्गाचा वापर करावा. 
पर्यायी मार्ग : पहिने – भिलमाळ – निरगुडपाडा – जांभुळपाडा – सापगाव – त्र्यंबकेश्वर.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलंय. वाहनचालकांनी वाहतूक अधिसूचनेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी केले आहेत. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES