SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

5 नगरसेवकांसह 250 पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश; एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबरदस्त झटका

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबरदस्त झटका देणारी घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या 5 नगरसेवकांसह 250 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 17, 2026, 04:34 PM IST | Updated: Oct 17, 2026, 04:35 PM IST
Join

सोलापूर : सोलापुरात मोठी राजकीय घडामोड घडली आहे.  सोलापुरात भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. या 5 नगरसेवकांसह 250 पदाधिकाऱ्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. 

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये हा मोठा पक्ष प्रवेश झाला आहे. तसेच खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, डीसीसीचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्यासह 250 पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ऐन डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपला लागली लॉटरी 

डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठी लॉटरी लागली आहे.  खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, डीसीसीचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्यासह 250 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. 

मंगळवेढा शहरासह ग्रामिणचे 10 सरपंच, 40 ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती सभापतीसह 17 संचालक, खरेदी विक्री संघाचे 15 सदस्य, 70 सोसायटी सदस्यांनी प्रवेश केला.  नगरपरिषदेला बबनराव आवताडे गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. मात्र आता ऐन डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. 

'कैसा हराया' म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या ठाण्यातील नगरसेविकेच्या वडिलांचा शिवसेनेत प्रवेश 

ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेली एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख हिचे वडील युनूस शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांची अखिल भारतीय केबल सेनेच्या कळवा मुंब्रा अध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली.  ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेख हिचे एक भाषण व्हायरल झाले होते. यामध्ये तिने 'कैसा हराया..', असे म्हणत विरोधकांना डिवचले होते. सहर शेखचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. याच सभेत सहर शेख हिने आपल्याला येणा-या काळात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरुन प्रचंड टीका झाली होती. टीका करणाऱ्यांमध्ये महायुतीसह शिंदे सेनेचाही समावेश होता. त्यामुळे आता शिंदेंकडून युनूस शेख यांना मानाचं पान दिल्यानं उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES