• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमधील 5 बड्या कंपन्यांची मोठी मागणी; ऑफिस कॅम्पस मेट्रो स्टेशनला जोडा?

पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमधील 5 बड्या कंपन्यांची मोठी मागणी; ऑफिस कॅम्पस मेट्रो स्टेशनला जोडा?

ऑफिस कॅम्पस मेट्रो स्टेशनला कनेक्ट करा अशी मागणी पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडीच्या आयटी पार्क मधील 5 कंपन्यांनी केली आहे. या कंपन्यांमध्ये 90,000 कर्मचारी काम करतात. असे झाल्यास या कर्मचाऱ्यांना थेट ऑफिसच्या दारातून मेट्रो पकडता येणार आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 03, 2026, 07:02 PM IST|Updated: Nov 03, 2026, 07:15 PM IST
joinshare
पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमधील 5 बड्या कंपन्यांची मोठी मागणी; ऑफिस कॅम्पस मेट्रो स्टेशनला जोडा?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने 5 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा कॉल; ऑडिओ तपासणीत मोठा खुलासा

तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने 5 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा कॉल; ऑडिओ तपासणीत मोठा खुलासा

2

पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कमधील 5 बड्या कंपन्यांची मोठी मागणी; ऑफिस कॅम्पस मेट्रो स्टेशनला जोडा?

3

वर्ल्ड कप फायनलच्या तिकिटांपेक्षा IND vs PAK सामन्याला जास्त मागणी, ICC कडे आली 8.4 मिलियन तिकिटांसाठी रिक्वेस्ट

4

बीडमध्ये ब्लॅकमेलिंगचा मोठा कांड उघड, प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन धक्कादायक प्रकार

5

4 नोव्हेंबर पासून IND VS NZ वनडे सीरिजला सुरुवात, रोहित - विराट उतरणार मैदानात, कुठे आणि कधी पाहाल सामना?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Metro Station Office Connectivity: पुण्यातील जगप्रसिद्ध हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसह पुणेकरांची अखेर भयानक वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी बहुप्रतीक्षित पुणेरी मेट्रो अर्थात पिंक लाईनचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात 17 स्थानकं खुली होणार असून गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे काही कंपन्यांचे ऑफिस कॅम्पस थेट मेट्रो स्टेशनला जोडले जाणार आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील 5 बड्या कंपन्यांनी ऑफिस कॅम्पसला मेट्रो स्टेशन कनेक्ट करण्याची मागणी केली आहे. 

हिंजवडी आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी,वाकड, औंध आणि शिवाजीनगर परिसरात दररोज वाहतुकीचा मोठा ताण पाहायला मिळत होता. याच वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून मेट्रो सुरु करण्याची मागणी केली जात होती.  माण हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पुण्याच्या IT पार्क मध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 
पहिल्या टप्प्यात 17 स्थानकांवरून मेट्रो प्रवास करता येणार आहे.

या मध्ये माण, माण midc सर्कल फेज 2,  माण बस डेपो, हिंजवडी फेज 2- सर्कल 2, हिंजवडी फेज 2 - सर्कल 1, पद्मभूषण चौक, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी, हिंजवडी फेज 1, वाकड चौक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, मिटकॉन बालेवाडी,  आर के लक्ष्मण म्युझियम बालेवाडी, औंध,  सकाळ नगर,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,  कृषी महाविद्यालय आणि  जिल्हा न्यायालय या स्थानकांचा समावेश आहे

तर बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर पाषाण लिंक रोड, भोसले नगर आरबीआय आणि  शिवाजीनगर  ही स्थानक बंद असणार आहेत. या सहा स्थानकांचं काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार असल्याने नोकरदार आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो साठी 12 रुपयांपासून 62 रुपयांपर्यंत तिकीट दर आकारण्यात येणार आहे.

मेट्रो स्थानकं ऑफिस कॅम्पला जोडण्याचा प्रस्ताव

मेट्रो स्थानक खुली झाली असली तरी या स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असावी अशी मागणी केली जात आहे.  हिंजवडी आयटी पार्कमधील पाच प्रमुख कंपन्यांना त्यांचे कॅम्पस मेट्रो स्थानकांशी जोडण्यासाठी समर्पित पादचारी पूल (FOBs)  उभारण्याची मागणी केली आहे. या कंपन्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांना प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे. 

ऑफिसच्या दारात मेट्रो स्टेशन

ऑफिस कॅम्पसला मेट्रो स्टेशनला कनेक्ट केल्यास प्रवाशांना इतर मार्गाने मेट्रो स्टेशनला पोहचावे लागणार नाही. कार्यालयाच्या गर्दीच्या वेळी वर्दळीचे रस्ते ओलांडावे लागणार नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल. 5 कंपन्यांनी पादचारी पुल उभारुन कंपनीचे कॅम्पस मेट्रो स्थानकांना जोडण्याची मागणी केली आहे. या 5 कार्यालयांमध्ये अंदाजे 90,000 कर्मचारी काम करतात.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Pune News
Pune Metro