IND VS NZ ODI Series : सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची टी20 सीरिज 3-2 ने आघाडी मिळवून भारताने जिंकली. त्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. 4 नोव्हेंबर पासून या सीरिजला सुरुवात होणार असून यात भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा देखील समावेश असणार आहे. या सीरिजमध्ये सुद्धा भारतीय संघ न्यूझीलंडचा पराभव करण्याच्या मनसुब्यानेच मैदानात उतरेल. तेव्हा पाच सामन्यांची ही वनडे सीरिज प्रेक्षक टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कुठे पाहू शकता याविषयी जाणून घेऊयात.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या सीरिज मधील पहिला सामना हा 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 7: 30 वाजता सुरु होणार आहे. त्यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल.
कुठे पाहाल सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या सीरिज मधील सर्व सामान्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग हे टेलिव्हिजनवर सोनी टीव्हीवर पाहायला मिळेल. तर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अँपवर पाहायला मिळेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड :
4 नोव्हेंबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड - पहिला सामना
7 नोव्हेंबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड - दुसरा सामना
10 नोव्हेंबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड - तिसरा सामना
13 नोव्हेंबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड - चौथा सामना
15 नोव्हेंबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड - पाचवा सामना
भारतीय संघ :
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, नमन धीर, औकिब नबी, रुतुराज गायकवाड, ईशान किशन.
न्यूझीलंड संघ :
हेन्री निकोल्स, विल यंग, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, ब्लेअर टिकनर, टिम सायफर्ट, काइल जेमिसन