IND VS NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 4 नोव्हेंबर पासून पाच सामन्यांच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी स्टार खेळाडूंसोबत प्री मॅच ट्रेनिंग सेशनमध्ये एक अपघात घडला. ज्यामुळे आता स्टार खेळाडू बुधवारी होणाऱ्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे. मंगळवारी ईडन पार्क येथे प्री मॅच ट्रेनिंग सेशन दरम्यान वेगवान गोलंदाज हॅट हेनरी सोबत टक्कर झाल्याने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेवोन कॉनवे याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर कनकशनमुळे डेवोन कॉनवेला पहिल्या सामन्यातून आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूझीलंड संघासमोर दुखापतीचं सावट :
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सेंटनरने सांगितलं की मॅट हेनरी कनकशन टेस्टनंतर ठीक दिसतोय. मात्र डेवोन कॉनवेला लगेचच स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आले. दोन खेळाडूंमध्ये झालेली ही टक्कर अतिशय गंभीर वाटत होती. कॉनवेची अनुपस्थिती न्यूझीलंडसाठी एक मोठा धक्का आहे, कारण हा संघ आधीच अनेक खेळाडूंच्या दुखापतींशी संघर्ष करत आहे. आता या यादीत कॉनवेचाही समावेश झाला आहे. याआधी फलंदाज मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र हे अनुक्रमे हॅमस्ट्रिंग आणि खांद्याच्या दुखापतींमुळे वनडे सीरिजमधून बाहेर पडले होते.
डेवोन कॉनवेच्या जागी कोण खेळणार?
टिम सिफर्ट हा डेवोन कॉनवेच्या जागी खेळायला येऊ शकतो. टिम सिफर्ट याला आधी फक्त सुरुवातीच्या दोन वनडे सामन्यात खेळवण्याचा विचार केला जात होता, त्यांना सोमवारी संपूर्ण सीरिजसाठी न्यूझीलंड संघाचा भाग बनवण्यात आलं आहे. सँटनरने असे सूचित केले की, जर कॉनवे उपलब्ध नसेल, तर त्याच्या जागी सायफर्ट खेळू शकतो. सँटनर म्हणाला, 'हो, मला वाटते की आमच्या संघात सिफर्ट हा बॅक अप फलंदाज आहे. त्यामुळे, जर डेवोन कॉनवे उपलब्ध नसेल, तर सिफर्टला संधी मिळण्याची शक्यता आहे'.
भारत विरुद्ध न्यूझीलंड :
भारत विरुद्ध न्यूझीलंड - पहिला सामना - 4 नोव्हेंबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड - दुसरा सामना - 7 नोव्हेंबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड - तिसरा सामना - 10 नोव्हेंबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड - चौथा सामना - 13 नोव्हेंबर
भारत विरुद्ध न्यूझीलंड - पाचवा सामना - 15 नोव्हेंबर