Hardik Pandya Trade Deal With Punjab Kings : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सीजन विषयी मोठी उत्सुकतात निर्माण झाली आहे. बीसीसीआयने 17 नोव्हेंबर पर्यंत सर्व आयपीएल फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या हा आगामी सीजनपूर्वी मुंबई इंडियन्समधून बाहेर पडेल अशी चर्चा सुरु आहे. मुंबईचा संघ अनेक आयपीएल संघांशी हार्दिकच्या ट्रेड डीलबाबत चर्चा करत आहे. अशातच पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हार्दिक पांड्याच्या ट्रेड विषयी बातचीत खूप पुढे गेली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. स्पोर्टस्टारला मिळालेल्या माहितीनुसार स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह आणि विकेटकिपर फलंदाज विष्णु विनोद हे हार्दिकच्या बदल्यात मुंबई इंडियन्समध्ये जाण्याची शक्यता आहे.
हार्दिकच्या बदल्यात कोण?
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघाचं सिनियर मॅनेजमेंट या प्रस्तावित ट्रेडसाठी जवळपास राजी झाला आहे. याची घोषणा आता 17 नोव्हेंबरच्या आदल्या आठवड्याच्या अंतापर्यंत केली जाईल. या करारासाठी पुढाकार मुंबई इंडियन्सकडून घेण्यात आली होती. पंजाब किंग्सलाही त्यांच्या संघात सामना जिंकून देऊ शकेल अशा ऑलराऊंडर खेळाडूची गरज होती. हार्दिकशी संबंधित प्रस्तावावर पंजाब किंग्सने सहमती दर्शवल्यानंतर, चर्चेचा ओघ अर्शदीप आणि विष्णू यांच्या दिशेने वळला.
केकेआर सोबत का झाली नाही डील?
मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या ट्रेड विषयी वेगवेगळ्या तीन फ्रेंचायझींशी बातचीत करत होती. मात्र त्यांच्या एका सोबत सुद्धा ही डील फायनल झाली नाही. पंजाब किंग्स शिवाय कोलकाता नाईट रायडर्स हा एकमेव संघ होता ज्या सोबत मुंबई इंडियन्सचं हार्दिक विषयी बोलणं खूप पुढे पोहोचलं होतं. मात्र कोलकाता नाईट रायडर्स हार्दिक पांड्याच्या बदल्यात हर्षित राणा आणि अंगकृष रघुवंशी या दोघांना मुंबई इंडियन्सकडे ट्रेड करण्यासाठी तयार नव्हता.
पंजाब किंग्सने अर्शदीपसाठी खर्च केले 18 कोटी रुपये :
2025 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने अर्शदीप सिंगला संघातून मुक्त केले होते. परंतु नंतर 'राईट टू मॅच' कार्डचा वापर करून त्याला पुन्हा संघात परत आणले. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी 15.75 कोटी रुपयांची बोली लावली होती, मात्र त्यानंतर 18 कोटी रुपयांची बोली लागल्यामुळे अर्शदीप सिंग पुन्हा पंजाब किंग्समध्ये सामील झाला. सनरायझर्स हैदराबादने आपली यशस्वी बोली वाढवून 15.75 कोटी रुपये केली, त्यानंतर 18 कोटी रुपयांची बोली लावली गेली आणि अर्शदीप सिंग पुन्हा पंजाब किंग्समध्ये परतला. मात्र आता मुंबई सोबत ट्रेड डील निश्चित झाली तर हार्दिकच्या बदल्यात अर्शदीप सिंह हा मुंबई इंडियन्सचा भाग होईल.