• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /IPL 2027 साठी प्लेअर रिटेंशनच्या मुदतीत वाढ, संघांना 'या' तारखेपर्यंत जाहीर करावी लागणार यादी

IPL 2027 साठी प्लेअर रिटेंशनच्या मुदतीत वाढ, संघांना 'या' तारखेपर्यंत जाहीर करावी लागणार यादी

IPL 2027 : बीसीसीआयने आयपीएल 2027 साठी प्लेअर रिटेंशनच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे फ्रेंचायझींना आणखीन दोन दिवसांची मुदत मिळणार आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 02, 2026, 10:01 PM IST|Updated: Nov 02, 2026, 11:06 PM IST
joinshare
IPL 2027 साठी प्लेअर रिटेंशनच्या मुदतीत वाढ, संघांना 'या' तारखेपर्यंत जाहीर करावी लागणार यादी
Image Credit: IPL 2027 साठी प्लेअर रिटेंशनच्या मुदतीत वाढ

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
नाशिकच्या शेतकऱ्याची गांजा लागवडीला अधिकृत परवाना देण्याची मागणी; कुंभमेळ्या गांजाची आवश्यकता असल्याचा दावा

नाशिकच्या शेतकऱ्याची गांजा लागवडीला अधिकृत परवाना देण्याची मागणी; कुंभमेळ्या गांजाची आवश्यकता असल्याचा दावा

2

राक्षसभुवनमध्ये गोदावरी आटली! दशक्रिया विधीसाठी भाविकांना विकतचं पाणी; तीर्थक्षेत्रावर दुष्काळाचं सावट!

3

IT इंजिनीयर, पुण्यातील झांबरे पॅलेच्या मालकाची सून, पायलचा मृत्यू, पती अक्षय झांबरेला अटक

4

40 व्हिला विकत घेतले, एका वर्षात 1.8 कोटी कमावले; भारतातील IAS-IPS नवरा बायकोची चौकशी करताना ACB चे अधिकारी चक्रावले

5

8000mAh बॅटरीसह Vivo चा परवडणाऱ्या किंमतीतला नवा 5G फोन लॉन्च! एकदा चार्ज केल्यावर किती टिकणार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IPL 2027 : बीसीसीआयने आयपीएल फ्रेंचायझींना त्यांची प्लेअर रिटेंशन लिस्ट जाहीर करण्यासाठी दिलेल्या मुदतीत वाढ केली आहे. बीसीसीआयने संघांना ईमेल पाठवून फ्रेंचायझींना सांगितलं आहे की आता ते 17 नोव्हेंबरपर्यंत खेळाडूंची फायनल लिस्ट जाहीर करू शकतात. सुरुवातीला प्लेअर रिटेंशनची मुदत ही 15 नोव्हेंबर होती. बीसीसीआयने आयपीएल मिनी ऑक्शनच्या तारखेत किंवा ठिकाणात कोणताही बदल केलेला नाही. हा कार्यक्रम 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे.

अचानक का बदलण्यात आली तारीख?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामन्यामुळे आयपीएल खेळाडूंच्या रिटेंशन लिस्ट सादर करण्याची अंतिम मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान वनडे सीरिजमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना 15 नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुई येथील बे ओव्हलवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने सर्व संघांना त्यांची रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन अतिरिक्त दिवस दिले आहेत. योगायोगाने ज्या दिवशी 16 डिसेंबर रोजी  मिनी ऑक्शन होणार आहे. त्याच दिवशी बेंगळुरूमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात एक वनडे सामनाही नियोजित आहे. आतापर्यंत बीसीसीआयने या सामन्याचे वेळापत्रक बदलण्याचा विचार केलेला नाही.

BREAKING: BCCI extends deadline to announce player retention by two days; teams can now announce retention/release list on November 17. The Board says postponement is due to NZ-India ODI on Nov 15. https://t.co/kB3DaxObby

 Vijay Tagore (vijaymirror) November 2, 2026

20 वा सीजन ठरणार खास :

आयपीएल 2027 हा इंडियन प्रीमियर लीगचा 20 वा सीजन असणार असून या करता गोव्यात डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन पार पडेल. यंदाच्या सीजनमध्ये अनेक स्टार खेळाडू ट्रेड किंवा त्यांच्या पारंपरिक संघातून रिलीज होण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या नावाबाबत सुद्धा चर्चा सुरु आहे. हार्दिक पांड्या साठी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये ट्रेड होणार असून हार्दिक ऐवजी केकेआर मधील हर्षित राणा आणि अंगकृश रघुवंशी यांना मुंबई इंडियन्स संघात घेऊ इच्छिते अशी माहिती आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
IPL
Cricket News