डोंबिवली क्राईम : डोंबिलीच्या खाडीत एका व्यक्तीचा मृतदहे आढळून आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, हा मृतदेह कुणाचा आहे याची ओळख स्वप्नामुले पटली आहे. मृत्ययूनंतर मृत मित्र 20 दिवस स्वप्नात येत होता. यामुळे संबधीत तरुणाने थेट पोलिस ठाणे गाठले आणइ पोलिसांना याची माहिती दिली. यामुळे हे संपूर्ण हत्या प्रकरण उघडकीस आले आहे.
डोंबिवलीत उघडकीस आलेल्या हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहेय तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. यामुळे पोलिस देखील चक्रावून गेले आहे. दारूच्या पार्टीत झालेल्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रभू करकडे असे आरोपीचे नाव आहे. प्रभू करकडे याने विशाल कदम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात विशालचा मृत्यू झाला. यानंतर प्रभने घरमालक संदेश मात्रे याच्या मदतीने विशालचा मृतदेह गोणीत भरून निर्जनस्थळी फेकला. मात्र हत्येनंतर तब्बल 20 दिवस मृत विशाल स्वप्नात येत होता.
आरोपीला पश्चात्ताप झाला आणि त्याने स्वतः ठाणे क्राईम ब्रँचच्या सेंट्रल युनिटमध्ये हजर होत हत्येची कबुली दिली. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी हत्या करणारा प्रभू करकडे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा घरमालक संदेश मात्रे या दोघांना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावल शहरातील आयशा नगर परिसरात ही घटना घडली. फरदीन खान (वय 21) असे आरोपी पतीचे नाव असून मशिराबी फरदीन खान असे मृत पत्नीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून फरदीन खान याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्येनंतर आरोपी पतीने घरातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. दरम्यान, पत्नीची हत्या करून पसार झालेल्या फरदीन खानला यावल पोलिसांनी साकळी गावाजवळून ताब्यात घेतले आहे. लग्नाला अवघे एक वर्ष झाले असतानाच घडलेल्या या घटनेमुळे यावल खळबळ उडाली असून याप्रकरणी फरदीन खान विरुद्ध यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.