• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /सूर्यकुमार यादव KKR मध्ये जाण्याची चर्चा असतानाच समोर आला 'हा' Video, अखेर शिक्कामोर्तब

सूर्यकुमार यादव KKR मध्ये जाण्याची चर्चा असतानाच समोर आला 'हा' Video, अखेर शिक्कामोर्तब

Suryakumar Yadav : भारताचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा आयपीएल 2027पूर्वी ट्रेड होणार अशी चर्चा रंगली होती. लखनऊ सुपर जाएंट्स आणि केकेआर हे दोन संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत अशी माहिती होती. मात्र सूर्यकुमार यादवने अखेर एक व्हिडीओ शेअर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 03, 2026, 04:32 PM IST|Updated: Nov 03, 2026, 05:40 PM IST
joinshare
सूर्यकुमार यादव KKR मध्ये जाण्याची चर्चा असतानाच समोर आला 'हा' Video, अखेर शिक्कामोर्तब
Image Credit: सूर्यकुमार यादव KKR, LSG मध्ये जाण्याची चर्चा असतानाच समोर आला 'हा' Video, अखेर शिक्कामोर्तब

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
दिवाळीपूर्वी सोन्या चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ, चांदी 10 हजारांनी तर सोनं 3 हजार 500 रुपयांनी वाढलं, पाहा सोनं चांदीचे ताजे रेट्स

दिवाळीपूर्वी सोन्या चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ, चांदी 10 हजारांनी तर सोनं 3 हजार 500 रुपयांनी वाढलं, पाहा सोनं चांदीचे ताजे रेट्स

2

दिवाळीच्या फराळात अ‍ॅड करा खास नारळाचे लाडू; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

3

विराटने केल्या 74 धावा, अर्शदीपने घेतल्या 4 विकेट्स तरी अंशुल कंबोज कसा ठरला प्लेअर ऑफ द मॅच?

4

गुरनूर ब्रार विरुद्ध न्यूझीलंडचा फलंदाज, मैदानावरच एकमेकांशी भिडले! पहा Video

5

लग्न कसं टिकवून ठेवावं? कॉलेजचा तरुणांसाठी कोर्स;सुखी संसाराचे शिकवणार धडे!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Suryakumar Yadav : इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगपैकी एक आहे. आयपीएल 2027 हा स्पर्धेचा 20 वा सीजन असणार आहे. या सीजनसाठी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन पार पडेल. तर 17 नोव्हेंबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यापूर्वी स्टार खेळाडूंच्या ट्रेडींग संदर्भात अनेक माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा कोलकाता नाईट रायडर्समध्ये ट्रेंड होऊन जाणार अशी चर्चा रंगलेली. सूर्यकुमार यादवला मुंबई संघात नेतृत्वाची संधी दिली जात नाहीये, त्यामुळे तो केकेआरमध्ये जाण्यासाठी उत्सुक असून तेथे अजिंक्य रहाणेनंतर त्याला नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते. मात्र या सर्व चर्चांना मंगळवारी एका व्हिडीओमुळे पूर्णविराम लागला आहे.

सूर्यकुमार KKR मध्ये जाण्याच्या रंगल्या होत्या चर्चा :

भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव हा मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. स्टार फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारला टीम इंडियाचा टी20 कर्णधार म्हणून संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वात भारताने 2026 चा टी20 वर्ल्ड कप सुद्धा जिंकला. मात्र अनुभवी खेळाडू असताना सुद्धा सूर्यकुमार यादवला रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची संधी देण्यात आली नाही. त्याऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यात आले. तेव्हा अनेक वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळल्यावर कर्णधारपदासाठी सूर्यकुमार हा इतर फ्रेंचायझींच्या संपर्कात असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत होती. सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्समध्ये येण्याच्या पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. तेव्हा सूर्यकुमार यादवला केकेआर ट्रेड करून आपल्या संघात घेईल असं बोललं जात होतं. तसेच ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सशी जोडल्यावर लखनऊ सुपर जाएंट्समधील कर्णधारपद सुद्धा रिकामे होते. अशावेळी लखनऊ फ्रेंचायझी सूर्यकुमार यादवला ट्रेड करून घेण्यासाठी उत्सुक दिसत होती. आता सूर्यकुमार यादवनेच मंगळवारी एक व्हिडीओ शेअर केला असून या सर्व शंकांना पूर्णविराम लावला आहे.

हेही वाचा : हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार? बदल्यात मुंबई इंडियन्सला मिळणार दोन स्टार खेळाडू

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सूर्यकुमार यादवने शेअर केला व्हिडीओ :

 

सूर्यकुमार यादवने त्याच्या ट्रेडच्या चर्चे दरम्यान एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये  प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्याने Back in the groove असं कॅप्शन दिलं असून मुंबई इंडियन्स सोबत व्हिडीओ कोलॅब सुद्धा केला आहे. फ्रेंचायझींसाठी 17 नोव्हेंबर रोजी रिटेंशन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर करण्याची ही शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी सूर्यकुमारने शेअर केलेल्या या व्हिडीओवरून तो मुंबई इंडियन्स सोडून जात नाहीये हे स्पष्ट होतंय. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
IPL
Suryakumar Yadav
Mumbai Indians