SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुण्यात CBI ची छापेमारी; 1.73 कोटींची रोकड जप्त

पुण्यात CBI ने छापेमारी केली. या कारावईत 1.73 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 14, 2026, 10:31 PM IST | Updated: Oct 14, 2026, 10:38 PM IST
Join

पुणे CBI कारवाई : पुण्यात CBI ने मोठी कारवाई केली आहे.  सीबीआयने पुण्यात छापेमारी केली आहे. 1.73 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.  म्हैसूर, बंगळूर आणि दिल्लीतही शोधमोहीम राबवली गेली. लाचखोरीच्या प्रकरणात CBI ने कारवाई केली आहे. 

लाचखोरीच्या एका प्रकरणात सीबीआयने म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या कार्यकारी संचालकासह तीन जणांना अटक केली आहे. आरोपींना 13 ऑक्टोबर 2026 रोजी अटक करण्यात आली. सीबीआयच्या माहितीनुसार 12 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पुण्यात कार्यरत असताना, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक, खासगी कंत्राटदार आणि विक्रेत्यांच्या संगनमताने, सरकारी कामाच्या बदल्यात लाच मागणे आणि स्वीकारणे यात सामील होते असा आरोप आहे. या प्रकरणात CBI ने छापेमारी केली. 

या प्रकरणात कारवाई करत, सीबीआयने पुण्यात आरोपी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी शोधमोहीम राबवून 1.73 कोटींची रोकड जप्त केली. म्हैसूर, बंगळूर आणि दिल्लीतील आरोपींच्या निवासस्थानीही शोधमोहीम राबवण्यात आली, जिथे अंदाजे 50 लाख रोकड आणि प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. सीबीआय या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष मुक्ततेला सीबीआयचे आव्हान

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या २००६ मधील हत्या प्रकरणात अपडेट समोर आलीय. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सत्र न्यायालयाचा निर्णय कायद्याच्या दृष्टीने चुकीचा असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी सीबीआयने केलीय. लवकरच या अपिलावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES