SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'तर त्याला फासावर...', अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात CM फडणवीसांची मोठी मागणी; अमित शाहांसमोर म्हणाले, 'या अपघातामागे...'

अजित पवारांचा जर अपघात असेल तर आमच्या सामान्यांच्या मनातील आक्रोशावर फुंकर पडली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 16, 2026, 16:03 IST | Updated: Nov 16, 2026, 16:12 IST
Image Credit: अजित पवारांच्या दुर्घटनेसंदर्भात CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
Join

अजित पवारांचं विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्यानंतर हा घातपात होता की अपघात याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. रोहित पवारांसह अनेकजण या दुर्घटनेवर संशय व्यक्त करत असून, यासंदर्भात आपल्या शंकाही वारंवार उपस्थित केल्या आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील चौकशी अहवाल लवकरात लवकर यावा अशी मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील संभ्रम दूर झाला पाहिजे असं म्हटलं. पुण्यात अमित शाह यांच्या हस्ते लोकनेते स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

हा अपघात आहे का या पाठीमागे काही घडलं आहे?

अजितदादांच्या जाण्याच्या चटका सर्वांच्या मनाला आहे. दादांच्या जाण्याने महाराष्ट्रातील जनमानसात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या चर्चाही झाल्या. सामन्यांना वाटते की हे घडलं ते काय आहे? हा अपघात आहे का या पाठीमागे काही घडलं आहे, याची स्पष्टता यावी, खरी माहिती मिळावी अशी बाब सातत्याने चर्चिली जाते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'...तर त्याला आम्हाला फासावर लटकवता आलं पाहिजे'

पुढे त्यांनी म्हटलं की, "आज गृहमंत्री महोदय यांना मी आज विनंती केली आहे की, आता आठ दहा महिने होत आहेत आणि एक मोठी चौकशी सुरू आहे. या चौकशीत अमेरिकेसोबत इतर राष्ट्राचे लोकही करत आहेत. त्यांच्या टीम मदत करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील संभ्रम दूर झाला पाहिजे. जो अहवाल आहे तो लवकरात लवकर आला पाहिजे. जर कोणी दोषी असेल तर त्याला आम्हाला फासावर लटकवता आलं पाहिजे. हा जर अपघात असेल तर आमच्या सामान्याच्या मनातील आक्रोशावर फुंकर पडली पाहिजे".

"अमितभाई यांनी विश्वस्त केलं आहे की, स्वत: लक्ष घालून लवकरात लवकर हा अहवाल आणण्यात येईल. मी त्यांचे त्यासाठी आभार मानतो. त्यांनी एकदा मनावर घेतल्यानंतर ते वेगाने करण्याचा प्रयत्न करतील. पण शंकांचं उत्तर मिळणं आवश्यक आहे".

 


"अजितदादांसारखा दुसरा नेता नाही, त्यांच्यासारखा सहकारी मिळणंही कठीण आहे. महाराष्ट्रात असे नेते तयार होण्यासाठी अनेक तप जावे लागतात. एका संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे, जे शेती मतााशी सामान्याशी जुळलेलं होतं. दादांनी जे कार्य अर्ध सोडलं आहे त्यासाठी सुनेत्रा वहिनी, त्यांच्या कुटुंबीयांच्या आपण पाठीशी राहून पुढे काम करू
आणि महाराष्ट्र घडवण्यास मदत करु," असं आश्वासन त्यांनी दिलं.

 

दादांनी दिलेलं योगदान आपण विसरु शकत नाही

"अनेक वेळा आपण एखाद्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला जातो तेव्हा मनात आनंद असतो पण आजचा कार्यक्रम वेगळा आहे. कारण ज्यांच्याडून संपूर्ण आयुष्य जगण्याची अपेक्षा होती, ज्यांच्याकडून कामं खूप झाली, पण अजून कामांची अपेक्षा होती. ज्याचं नेतृत्व सातत्याने बहरत होतं ते दादा आपल्यातून अचानक गेल्यावर आज त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना आठवणीचे काहूर आहे. त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा आनंद आहे, पण ते आपल्यात नाहीत याचं मनस्वी दुखःही आहे. अशा प्रकारच्या संमिश्र भावना असताना, मी जिल्हा परिषदेचे आभार मानतो. दादांचं प्रचंड प्रेम असलेली ही परिषद, जिल्हा. पुणे जिल्ह्यावर दादांचं किती प्रेम होतं हे सर्वांना माहिती आहे. पुणे जिल्हा परिषदेला दिशा देण्याचे काम दादा यांनी केलं. सात आठ अध्यक्ष दादांच्या नेतृत्वात तयार झाले.  पुणे जिल्ह्याच्या गावागावात वाड्यांध्ये विकास पोहोचवायचा ध्यास दादांनी घेतला होता. महाराष्ट्रात दादांचं नेतृत्व होतंच पण पुणे जिल्ह्याबद्दल दादांच्या मनात वेगळी संवेदना होती. या सगळ्या भागाच्या विकासाठी दादांनी दिलेलं योगदान आपण विसरु शकत नाही. हा जो प्रगतीचा आलेख पाहत  आहोत त्याचा इतिहास लिहित असताना त्यात दादांच्या नावाचं सुवर्णपान लिहिल्य़ाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही," असंही ते म्हणाले.

"वहिनी चांगलं काम करत आहेत, पण भीषण दुष्काळाची अवस्था असताना पदोपदी दादांची आठवण येते की दादा असते तर दुष्काळात शेती मातीशी संबंध असलेला हा गडी मैदानात उतरला असता आणि दुष्काळाशी दोन हात केले असते," असंही त्यांनी म्हटलं. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES